फॉलोअर

www – वल्ड वाईड वेब



www अर्थात वेब ज्यावर एकत्रित साठवलेल्या माहितीतून ठराविक माहिती मिळविण्याची सुविधा यामुळे आपणांस आज मिळते आहे. वेब मुळे आपल्याला एकमेकाशी हायपरटेक्स्ट / हायपर मीडिया लिंक्स च्या सहाय्याने जोडलेल्या विविध डॉक्युमेंट्स ची माहिती सहज उपलब्ध होवू शकते, अशा या www- वेब ह्या संकल्पनेला आज तीस वर्षे झाली. १२ मार्च १९८९ रोजी टीम बर्नर ली या इंग्लिश शास्त्रज्ञाने वल्ड वाईड वेब ची सुरुवात केली. टीम बर्नर ली त्यावेळी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीअर रिसर्च (CERN) येथे सेवा बजावत होते. याच दरम्यान त्यांनी वेब ब्राऊजर तयार केला पण तो या ऑर्गनायझेशनच्या बाहेर प्रकाशित करण्यात आला. डॉक्युमेंट्स अथवा वेब स्त्रोतांना पाहण्यासाठी ब्राऊजर चा वापर करून झालेली हि सुरुवात, इंटरनेट मध्ये क्रांतीच म्हणावी लागेल. हे वेब स्त्रोत यु.आर.एल. (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) च्या मदतीने पाहण्यास सुरुवात झाली जसे कि www.example.com, यामध्ये विविध हायपर टेक्स्ट ज्या विविध लिंक्स ने जोडलेले असतं अशा लिंक्स ना इंटरनेट च्या सहाय्याने पाहता येवू लागले. वेब हि संकल्पना क्लायंट सर्वर या फॉरमॅट मध्ये काम करते. इंटरनेट वापरत असताना आय.एस.पी. (इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर) च्या मदतीने सर्फिंग चा आनंद आपण सगळेजण घेतो पण www-वेब  या संकल्पनेचे श्रेय ‘ली’ या शास्त्रज्ञास द्यावे लागेल.
          ‘ली’ यांनी जगभरात माहितीचे जाळे व्यापले जाऊ शकते असा विचार सुरु करण्यामागे १९८८ साली युरोप आणि उत्तर अमेरिका दरम्यान जोडल्या गेलेल्या आय.पी. (इंटरनेट प्रोटोकॉल) कनेक्शन चा मोठा हात म्हणता येवू शकेल. कारण याच कनेक्शन मुळे याची व्यापकता ‘ली’ यांच्या ध्यानात आली आणि मग डोमेन नेम सिस्टम आणि मग त्यानंतर यु.आर.एल. असा प्रवास करीत आपण विविध वेब साईट आज पाहतो आणि त्या वापरतो. ‘ली’ यांनी पुढे जावून एच.टी.एम.एल. (हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज), यु.आर.एल. (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर), आणि एच.टी.टी.पी. (हायपर टेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल) हे तीन आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले. वल्ड वाईड वेब लवकरच सर्वांनी स्विकारल कारण मोझॅक नामक ब्राऊजर ! या ब्राऊजर मुळे वेब ब्राउज करणं युजरला खूप सोप होवू लागलं. याचही एक खास कारण आहे ते म्हणजे “पॉइंट अँन्ड क्लिक” अशी सुविधा यात देण्यात आली होती. जे डॉक्युमेंट पहायचे आहे त्यावर माउस ने पॉइंट करायचं आणि क्लिक करायचं हि सुविधा यानंतर बरेच दिवस वापरली गेली. १९९४ मध्ये नेटस्केप नॅव्हीगेटर नावाच्या ब्राऊजर ची सुरुवात झाली आणि पाहता पाहता वेब युजर्स ची संख्या दशलक्ष च्या घरात गेली. मागील वर्षी हीच युजर संख्या ३.९ अब्ज एवढी नोंदविली आहे. मायक्रोसॉफ्ट ने देखील त्यांच्या विंडोज ९५ मध्ये प्रथम इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊजर देवू केला. आज आपण विविध ब्राऊजर च्या सहाय्याने वेब पाहतो ज्यामध्ये गुगल क्रोम, मॉझिला फायरफॉक्स, ऑपेरा इ. ब्राऊजर चे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे.
          माहितीचा खजिना सर्वांसाठी उघडल्या बद्दल धन्यवाद टीम बर्नर ली !


अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?