पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

ए भाई जरा देख के !!

इमेज
वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हेच मुळी आपल्याला रुचत नाही. काय होतं? हा जो फाजील आत्मविश्वास आहे तो बऱ्याच वेळा घातक ठरतो. मग अनुज्ञाप्ती (लायसन्स) नसतानाही वाहन चालविणाऱ्या छोटे सरकार ते घरातील कर्तबगार व्यक्ती अशा अनेकांमध्ये असाच आविर्भाव पहायला मिळतो. थांबा असा सिग्नल लागलेला असताना देखील जायची प्रचंड घाई असणारे असोत कि सिग्नल सुटायच्या आधीच वाहन दामटणारी प्रचंड व्यस्त (बरोबर ओळखलतं, मोबाईल वर व्यस्त असणारी) मंडळी असोत या सगळ्यांसाठी श्री.यमराज विश्रांती घेत असतात त्यामुळेच आत्मविश्वासाचे रुपांतर फाजील आत्मविश्वासात होते. हे सगळं खूप भयंकर आहे असं नाही का वाटतं? आपण किती जरी व्यवस्थित वाहन चालवीत असलो तरी समोरून येणारे वाहन चालविणारा कसा वाहन चालवितो यावर देखील बरेच अवलंबून असते म्हणूनच सर्वांनीच नियमांची पायमल्ली थांबवावी.               सोलापूर जिल्ह्याशी जोडले जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन रुपडं घेवून सेवेत तयार होत आहेत, हे आपण जाणतोच, त्याचप्रमाणे हे महामार्ग विविध आव्हानं देखील सोबत आणत आहेत कि काय? अस वाटतं. तस पाहिलं तर अपघाता...