पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

कुछ तो लोग कहेंगे – उस्ताद आनंद बक्षी

इमेज
गीतकार आनंद बक्षी यांना उस्ताद म्हणणं अगदी योग्य वाटतं मला, कारण जीवनाशी संबंधित अनेक मूल्यं, वास्तव त्यांनी शब्दांच्या जादूने पडद्यावर मांडली. समकालीन गीतकार ज्यामध्ये कवी असणारे मजरूह, कैफी आझमी यांच्या विषयी त्यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते ते त्यांच्या कामावरील निष्ठा दाखवते, ते म्हणाले होते, “कवी हा स्वत:च्या कल्पनेतून लिहितो, मी कथा, पात्र आणि परिस्थितीतून प्रेरित होऊन लिहितो.” कामाप्रती असणारं समर्पणच दिसतं यातून, म्हणूनच चार दशकं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, ५५० चित्रपट आणि ४००० गीतांद्वारे चित्रपट सृष्टीत योगदान देणारे आनंद बक्षी हे विरळच !! २१ जुलै १९३० रोजी अखंड हिंदुस्थानच्या रावलपिंडी (आता पाकिस्तान मध्ये) येथे त्यांचा जन्म झाला, परंतु फाळणी नंतर हिंदू शरणार्थी म्हणून हिंदुस्थानात आले. आनंदजी यांचे वडील रावलपिंडी येथे एका बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते, घरात सर्वजण त्यांना नंदू म्हणून हाक मारत असतं, त्यांना आनंद प्रकाश म्हणून ओळखलं जात असे पण त्यांचे मित्र-परिवार त्यांना आनंद बक्षी म्हणून संबोधत असत. फाळणी नंतर बक्षी कुटुंब दिल्ली येथे आले आणि