फॉलोअर

आय.ओ.टी. शी संबंधित स्मार्ट साधनं

 इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयी अगोदरच लेख तुम्ही वाचला आहे, तो पुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हि संज्ञा सर्व प्रथम १९९९ मध्ये एका ब्रिटीश व्यावसायिकाने अॅटो आय-डी लब मध्ये वापरली परंतु आता तज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग्ज २०२० पर्यंत म्हणजे अगदी पुढच्या वर्षी पर्यंत या मध्ये २६ अब्ज वस्तूंचा समावेश असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज विविध गोष्टींचा बोध घेवून त्यांना उपलब्ध नेटवर्क पायाभूत सुविधांचा वापर करून, दूरस्थपणे (remotely) नियंत्रित करू शकेल. यामुळे वास्तविक जग आणि संगणकीय प्रणाली यांचा मेळ घालणे शक्य होणार आहे. अर्थातच याचा फायदा कार्यक्षमता वाढण्यात, अचूकपणा व आर्थिक बचत या सर्वामध्ये होणार आहे. आज मी तुम्हाला काही आय. ओ. टी. संबंधित वस्तूंची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जग अगदी बदलून जाईल.

१.    हावभाव नियंत्रण करणारे यंत्र (Gesture Control Armband): कोणतीही गोष्ट करायची असल्यास आपले हावभाव बदलतात, हात वारे करताना हे टिपता येवू शकतात मग तुमच्या याच हावभावा वर हे यंत्र काम करणार आहे. यात काही इलेक्ट्रोडस् (विद्युत घटाचा ध्रुव) लावलेले असणार आहेत जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतील, समजून घेवू शकतील- हाताच्या हालचालीत स्नायूंचे संकुचन आणि विश्रांती, या हालचाली इलेक्ट्रोडस् डिजिटल संदेश स्वरूपात वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअर ला पाठवतील आणि सॉफ्टवेअर हे संदेश कमांड्स स्वरूपात वापरतील आणि क्रिया घडविली जाईल. हे सगळं स्वप्नवत वाटतं असलं तरी सत्यात उतरेल हे नक्की !


२.    लाईटिंग कंट्रोल: हि सेवा आजही सुरु आहे, तुम्ही टेलिव्हिजन वर काही जाहिराती पहात असाल तर तुमच्या लक्षात येईल. विविध सेन्सर च्या सहाय्याने माणूस खोलीत उपलब्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करून दिवे बंद चालू होवू शकतात.

३.    स्मार्ट ग्लास : तुमच्या सुदृढ आरोग्याचा पार्टनर म्हणू आपण यास. रोज तुम्ही किती पाणी प्यावे यावर नियंत्रण ठेवायचे काम हे करेल. तुम्ही कधी पाणी पिण्यात कमी पडलात तर तुम्हाला लागलीच त्याची आठवण करून देण्याचे काम हे ग्लास करतील.

४.    स्मार्ट आय: याच्या नावा प्रमाणे हे काम करतील, ब्लू टूथ किंवा वाय-फाय सुविधेने हे जोडले जातील आणि ई-मेल्स तपासणे, इंटरनेट वर सर्फिंग करणे, मॅप्स उघडणे, आनंदाचे क्षण स्टोअर करणे (फोटो काढणे) इ. सेवा स्मार्ट आय च्या सहाय्याने वापरता येतील.

५.    पल्स ऑक्सिमीटर: ट्रेकर ऑक्सिजन ची उपलब्धतता पाहण्यासाठी याचा वापर करतात, पण आता तुम्हाला ऑक्सिजन ची आवश्यकता पडल्यास याची माहिती डॉक्टरांना देण्याचे काम पल्स ऑक्सिमीटर करणार आहे. हे स्मार्ट साधन अनेक आजारांमध्ये उचित प्रतिबंधात्मक उपाय घेण्यात मदत करू शकतं.     

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?