स्टार्टअपची कल्पना
स्टार्टअप हा शब्द आपल्या चांगला परिचयाचा झाला आहे. त्यास वेगळ्या ओळखीची गरज नाही असं वाटतं मला पण ज्या शिक्षण पद्धतीत आपण वाढलो, शिकलो ती शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम जॉबची संधी देऊ करते, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे आपण जाणलं, समजलं पाहिजे. मग जर स्वत:चा स्टार्टअप करायचा असेल तर तुमच्याकडील कल्पनांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. कल्पना ही अद्वितीय हवी, ती नवीनच असावी असे नाही एखाद्या प्रचलित गोष्टीमध्ये बदल करून नवीन सुरुवात देखील स्वागतार्ह आहे. मी माझ्या व्याख्यानात सांगतो तेच पुन्हा सांगेन “कल्पनांचा नवोन्मेष” फार महत्वाचा. आपल्या युवक वर्गाकडे असे कौशल्य आहे त्यास गरज आहे आत्मविश्वास देण्याची आणि “हो पुढे मी तुझ्या सोबत आहे” असा विश्वास देण्याची. जमशेठजी टाटा यांना कोणती कल्पना सुचली की त्यांनी भव्य मोटर्स कंपनी बनविण्याचे ठरविले? धीरूभाई अंबानी यांना कोणती कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी सुरू केली जी आज सर्वात मोठी कंपनी आणि भारताची शान म्हणून आपण पाहतो. या दोघांमध्ये आणि इतर यशस्वी उद्योजकां मध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्यांनी त्यांच्य