फॉलोअर

स्टार्टअपची कल्पना


 

स्टार्टअप हा शब्द आपल्या चांगला परिचयाचा झाला आहे. त्यास वेगळ्या ओळखीची गरज नाही असं वाटतं मला पण ज्या शिक्षण पद्धतीत आपण वाढलो, शिकलो ती शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम जॉबची संधी देऊ करते, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे आपण जाणलं, समजलं पाहिजे. मग जर स्वत:चा स्टार्टअप करायचा असेल तर तुमच्याकडील कल्पनांना भरारी घेण्यासाठी पंख देण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. कल्पना ही अद्वितीय हवी, ती नवीनच असावी असे नाही एखाद्या प्रचलित गोष्टीमध्ये बदल करून नवीन सुरुवात देखील स्वागतार्ह आहे. मी माझ्या व्याख्यानात सांगतो तेच पुन्हा सांगेन “कल्पनांचा नवोन्मेष” फार महत्वाचा. आपल्या युवक वर्गाकडे असे कौशल्य आहे त्यास गरज आहे आत्मविश्वास देण्याची आणि “हो पुढे मी तुझ्या सोबत आहे” असा विश्वास देण्याची.

          जमशेठजी टाटा यांना कोणती कल्पना सुचली की त्यांनी भव्य मोटर्स कंपनी बनविण्याचे ठरविले? धीरूभाई अंबानी यांना कोणती कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनी सुरू केली जी आज सर्वात मोठी कंपनी आणि भारताची शान म्हणून आपण पाहतो. या दोघांमध्ये आणि इतर यशस्वी उद्योजकां मध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्यांनी त्यांच्या आजूबाजूस असणारी सामान्य माणसाची समस्या जाणली आणि त्यावर उत्तम उपाय शोधला आणि एक सुरुवात केली !! अशीच सुरुवात तुम्हीही करणं अपेक्षित आहे.

स्टार्टअप आयडिया कशी शोधाल ?

१.      समस्या शोधा: - तुमच्या आजूबाजूस असणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या शोधा आणि त्यावर उपाय शोधायला सुरुवात करा. तुम्हाला तुमची स्टार्टअप आयडिया शोधण्यास नक्की मदत होईल.

२.      तुमची आवड: तुमची आवड, तुम्हाला जमणाऱ्या गोष्टी आणि समाजास त्याची गरज आहे का तपासून पहा, असल्यास पुढे जा.

३.      नाविण्यपूर्ण उपाय शोधा:- जर तुम्हाला एखादी समस्या दिसली की जी तुम्ही सोडवू शकता कारण समस्या ही तुमच्या आवडी प्रमाणे आहे. आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन शोधणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. उदा. - लाकडात खिळे ठोकण्यासाठी  प्रत्येकजण हातोडा वापरू शकतो, परंतु नेल गन हे खूप सोपे आणि जलद काम करते. त्याचप्रमाणे, आधीपासून असलेल्या समस्येच्या उपायांबद्दल संशोधन करा (असल्यास) आणि एक चांगला उपाय शोधा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक कराव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?