“स्टार्ट अप” इंडिया
स्टार्टअप लेखमाला सुरू झाली आणि त्याचे चार भाग प्रकाशित देखील झाले. स्वत:चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे.
तुमच्याकडील कल्पनांची पारायणं तज्ञ व्यक्तीं सोबत करावी लागतील, त्यास प्रमाणित करून घ्यावे लागेल, तुमची कल्पना समाजातील कोणत्या प्रकारची अडचण सोडवू शकते आहे का , हे तपासून पहाव लागेल, त्यास सामाजिक स्तरावरून समर्थन कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे लागेल, छोट्या प्रमाणात त्याची उपलब्धता करून पडताळणी करता येऊ शकेल, ग्राहक वर्ग उपलब्धता , व्यावसायिक मॉडेल बनवावे लागेल, निधी सुरक्षा, या बाबीं कडे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. याची पूर्ण तयारी झाली की टेक-ऑफ !!!!!
२०१६ साली भारत सरकारने स्टार्टअप ही
योजना सुरू केली. स्टार्टअप इंडियाचे
प्राथमिक उद्दिष्ट स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती आणि संपन्नता निर्माण करणे हे आहे. स्टार्टअप इंडियाने एक मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम-
अर्थात लोक, संस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर
संवादाचे नेटवर्क (भारतीय इको सिस्टिम जागतिक क्रमवारीत तृतीय क्रमांकाची इको
सिस्टिम आहे) तयार करण्यासाठी आणि
भारताला नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्यांच्या देशात बदलण्यासाठी
अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. हे कार्यक्रम औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग (DPIIT)
द्वारे व्यवस्थापित केले जातात.
भारत सरकारच्या
स्टार्ट अप योजनेचा लाभ घेण्यासाठी :
v कंपनी: कंपनीचे वय १० वर्षा पेक्षा जास्त असू नये.
v कंपनीचे स्वरूप प्रायव्हेट लिमिटेड, एल. एल. पी. स्वरूपात असावी
v वार्षिक उलाढाल: स्थापनेपासून रु. १०० करोड पेक्षा जास्त
असू नये
v कंपनीचे मूळ अस्तित्व सुरू असलेल्या व्यवसायातून सुरू
केलेला व्यवसाय असू नये, वेगळी नोंदणी गरजेची आहे.
v नाविन्यपूर्ण आणि स्केलेबल -
उत्पादन,
प्रक्रिया किंवा सेवेच्या विकासासाठी किंवा सुधारणेसाठी
योजना किंवा रोजगार निर्मितीसाठी उच्च क्षमता असलेले स्केलेबल व्यावसायिक मॉडेल असावे.
भारत सरकार कडून
दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा :
v इन्कम टॅक्स सूट (80 IAC) : एकूण १० वर्षांच्या कालावधीत पहिली ३ वर्ष इन्कम टॅक्स भरण्यातून सूट
देण्यात आली आहे.
v कामगार कायदा आणि पर्यावरण कायदा – यामध्ये देखील सूट
देण्यात आली आहे.
v स्टार्टअप्सवरील नियामक ओझे कमी करण्यासाठी स्वयं-प्रमाणीकरणाची
प्रक्रिया आहे. त्यामुळे स्टार्टअप्स मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करू
शकतात.
v भारत सरकारने स्टार्टअपसाठी रु.
2500 कोटींचा निधी,
तसेच रु. 500 कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी फंड उपलब्ध करून दिला आहे.
मित्रहो, तुमची आवड, तुम्हाला कायं जमतं आणि समाजास त्याची गरज आहे का? या गोष्टी
तपासल्या तर मला वाटतं तुम्ही देखील एक उत्तम स्टार्टअपच उदाहरण बनू शकता, हो, हो
आपल्या सोलापुरातील स्टार्टअपचे उदाहरण, जे इतर मित्रांना प्रेरणा देऊ शकेल.
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
Bahut achchi jaankari...
उत्तर द्याहटवाGenyoutube
Save From Net