पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

स्टार्टअप – सुरुवात कशी करावी ?

इमेज
  स्वत :चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे. तुम्ही कोणत्याही स्टार्टअप कल्पनेवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे.   १.       तुम्ही तुमच्या स्टार्टअप कल्पनेवर उत्कट (पॅशनेट) आहात काय ? २.    ...