फॉलोअर

स्टार्टअप – सुरुवात कशी करावी ?


 


स्वत:चा व्यवसाय आणि आवश्यक असणारी व्यावसायिकता अंगिकारणे त्यापुढे जाऊन उद्योजक बनणे असा हा प्रवास. या प्रवासास सुरुवात कशी करावी आणि कोणते मुद्दे ध्यानात घ्यावेत याविषयी मागील भागात आपण माहिती घेतलेली आहे. सोबत यशस्वी होण्यासाठी कान मंत्र देखील सांगितला आहे. आता मला वाटतं गरज आहे ती नव्या कल्पना घेऊन पुढे येण्याची , कल्पनांचा नवोन्मेष घेऊन युवक-युवतीनी पुढे यावे, विषयाविषयी सादरीकरण करावे, माहिती द्यावी, त्यावर चर्चा करावी स्वत:चा मुद्दा, विषय पटवून द्यावा, त्यास प्रमाणित करून घ्यावे आणि कामास लागावे. सोलापुरातील युवक मंडळीं कडे अफाट कल्पना आहेत त्यांनी त्या सादर कराव्यात आणि एका नवीन प्रवासास सुरुवात करावी. मागील भागात जसे आपणास सांगितले होते की सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांचे वतीने स्टार्ट अप आणि सेवा या विषयी पूर्ण सपोर्ट दिला जात आहे.

तुम्ही कोणत्याही स्टार्टअप कल्पनेवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे.  

१.      तुम्ही तुमच्या स्टार्टअप कल्पनेवर उत्कट (पॅशनेट) आहात काय ?

२.      कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे काय?

३.      अपयश आल्यास स्वीकारण्याची मानसिकता आहे का? हार मानायची नाही असा बाणा सोबत आहे का?

स्टार्टअप करण्यासाठी तुमच्याकडे योजना आणि कोणत्या प्रक्रिया करायच्या याची यादी असणे गरजेचे आहे.

१.      तुमच्या कल्पनेची व्यवहार्यता तपासा- तुमची कल्पना बाजारातील तफावत दूर करू शकते का? याची व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. ते कसे हे मागील भागात विस्तृत सांगितले आहे. कल्पनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी ::-

a.    बाजार सर्वेक्षण

b.    तज्ञांचा सल्ला

c.    तत्सम कल्पनेवर मागील बाजार संशोधन (तुमच्यासारख्या कल्पनेवर पूर्वी केलेले संशोधन)

२.      व्यवसाय योजना : सुरुवात करण्यापूर्वी व्यवसाईक योजना तयार ठेवणे गरजेचे आहे. हर करीत असताना खालील गोष्टी महत्वाच्या वाटतात.

a.    कंपनीचे वर्णन

b.    संधि आणि बाजार ज्ञान

c.    बाजारात जाण्याची रणनीती

d.    व्यवसाय मॉडेल

e.    व्यवस्थापन व संघटन

f.     विपणन योजना

g.    आर्थिक योजना

पुढील गोष्टी पुढच्या भागात पाहुयात.

 

लक्षात ठेवा, स्टार्टअप मध्ये यशस्वी व्हायचं असल्यास स्टार्टअप मानसिकता असणे आवश्यक आहे, आणि चांगला परिणाम दिसण्यासाठी वेळ द्यावा आणि मेहनत घ्यावी लागेल.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?