पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

पंचम

इमेज
  “ याद आ रही है , तेरी याद आ रही है” , २७ जून पंचम ‘दा’ चा ८ ३ वा वाढदिवस , कालच एका FM वर वाढदिवसाच सेलिब्रेशन सुरु झालं होतं आणि मनात पंचम च्या संगीताची लहर उमटली आणि त्यांची विविध सदाबहार गाणी भाव-विश्वात तरळू लागली. संगीताची जाण आणि विविध रागांवर असणारी पकड पंचमदा ं ची जमेची बाजू होती. पंचमदा बाबतीत एक किस्सा ऐकिवात आहे , जेंव्हा युवा पंचम ने संगीत देण्यास सुरुवात केली तेंव्हा ते फारसे कोणास परिचित नव्हते , पण त्यांचा एक परिचय सर्वश्रुत होता तो म्हणजे महान संगीतकार एस.डी.बर्मन यांचे सुपुत्र !! जेंव्हा पंचम कुठे बाहेर जात तेंव्हा लोक म्हणत , “ वो देखो एस.डी.बर्मन का बेटा जा रहा है |” काही कालावधी नंतर जेंव्हा पंचम दा ना पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांचे संगीत लोकप्रिय झाले तेंव्हा एस.डी. बर्मन  यांना पाहताच लोक म्हणू लागले , “ वो देखो पंचम के पिताजी जा रहे है |” एका बापाला याच्या पेक्षा कोणते मोठे सुख असेल कि त्याला त्याच्या मुलाच्या कर्तृत्वा मुळे लोक ओळखू लागतात. हिंदी चित्रपट सृष्टीत एस.डी.बर्मन म्हणजे वटवृक्ष , या वटवृक्षाच्या छायेत वाढायचं आणि स्वत:च वेगळ अस्तित्व निर्माण करायचं