फॉलोअर

पंचम

 


याद आ रही है, तेरी याद आ रही है”, २७ जून पंचम ‘दा’ चा ८ वा वाढदिवस, कालच एका FM वर वाढदिवसाच सेलिब्रेशन सुरु झालं होतं आणि मनात पंचम च्या संगीताची लहर उमटली आणि त्यांची विविध सदाबहार गाणी भाव-विश्वात तरळू लागली. संगीताची जाण आणि विविध रागांवर असणारी पकड पंचमदाची जमेची बाजू होती. पंचमदा बाबतीत एक किस्सा ऐकिवात आहे, जेंव्हा युवा पंचम ने संगीत देण्यास सुरुवात केली तेंव्हा ते फारसे कोणास परिचित नव्हते, पण त्यांचा एक परिचय सर्वश्रुत होता तो म्हणजे महान संगीतकार एस.डी.बर्मन यांचे सुपुत्र !! जेंव्हा पंचम कुठे बाहेर जात तेंव्हा लोक म्हणत, “वो देखो एस.डी.बर्मन का बेटा जा रहा है |” काही कालावधी नंतर जेंव्हा पंचम दा ना पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांचे संगीत लोकप्रिय झाले तेंव्हा एस.डी. बर्मन  यांना पाहताच लोक म्हणू लागले , “वो देखो पंचम के पिताजी जा रहे है |” एका बापाला याच्या पेक्षा कोणते मोठे सुख असेल कि त्याला त्याच्या मुलाच्या कर्तृत्वा मुळे लोक ओळखू लागतात. हिंदी चित्रपट सृष्टीत एस.डी.बर्मन म्हणजे वटवृक्ष , या वटवृक्षाच्या छायेत वाढायचं आणि स्वत:च वेगळ अस्तित्व निर्माण करायचं म्हणजे काही साध काम नाही, ती एक तपश्चर्याचं म्हणावी लागेल, संगीता प्रती समर्पण भाव, प्रत्येक वेळी नव काही देण्याचा प्रयत्न हेच पंचम दा ना सगळ्यांपेक्षा वेगळ ठरवतं अस मला वाटत.

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है”, यात असणारी सहजता पण गायन करते वेळी जाणवते कि चाल अवघड आहे. पंचम विविध वाद्यांचा वापर संगीतात करायचे जसे “पडोसन” , “परिचय”, “सागर” अजूनही बरेच आहेत, पण या चित्रपटातील गाणी ऐकली कि माहौल बदलतो, एक आनंदी वातावरण तयार होते, पडोसन मध्ये तर विविध वाद्य याप्रकारे वापरली आहेत कि मोठ मोठ्या संगीतकारांना अद्यापही त्याच कोडं आहे. याच प्रकारात “शोले” मध्ये असलेले संगीत सुद्धा असेच गूढ निर्माण करते, आजकाल रिमेक चा जमाना आहे, त्यामुळे संगीत रिमेक केले जाते त्यावेळी या नव-संगीतकारांना हे गूढ लवकर उलगडत नाही. एखादा स्वर कसा वापरला आहे हे लक्षात येत नाही. हि पंचमदा ची खासियत म्हणावी लागेल. एखाद्या गाण्यास चाल लागे पर्यंत पंचम बेचैन असत, काही कल्पना डोक्यात येताच ते लागलीच त्यांच्या रेकॉर्डिंग रूम मध्ये जात आणि रेकॉर्ड करत असतं. गाण कधीही कम्पोज करता येत अस ते मानत, म्हणूनच रिता पटेल यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर एका हॉटेल मध्ये जेंव्हा पंचम बसले होते तेंव्हा त्यांनी “परिचय” मधील “मुसाफिर हुं यारो” हे गाण कम्पोज केले.

७० च्या दशकात प्रदर्शित झालेला “अमर प्रेम”, यातील सगळीच गाणी लोकप्रिय आहेत, एखाद गाण सांगायच झाल, तर शक्य नाही, सगळीच लोकप्रिय पण राग “भैरवीत” गायलेले “चिंगारी कोई भडके” हे गीत, त्यातील ठहराव, किशोरदा यांचा दर्द भरा आवाज आणि तितक्याच ताकदीच गीत जे उस्ताद आनंद बक्षी यांनी लिहील होत, आहा ! हे गाण कधीही ऐकावं, असचं आहे. याच चित्रपटातील “रैना बीती जाये” हे गाण कंपोज करताना विविध नोट्स चे कॉम्बीनेशन करून हे गाण तयार केलं आहे अस स्वत: पंचम सांगतात, एका कोठ्यावर रात्री हे गाण चित्रित करताना त्या परिस्थिती प्रमाणे संगीत तयार करण्याच कसबं. आता हेच पहा ना, “कुदरत” या चित्रपटातील “हमें तुमसे प्यार कितना” हे गीत किशोर दा नी हि गायलेले आहे आणि बेगम परवीन सुलताना यांनीही गायलं आहे, पण चित्रपटातील सिच्युएशन वेग वेगळ्या आहेत, बऱ्याच वेळा चित्रपटातील अशाच सिच्युएशन पंचमदा ना प्रेरक ठरायच्या आणि गाणं तयार व्हायचं.

पंचम ना पुढील पिढीचे संगीतकार म्हणालो तर वावग होणार नाही, कारण ७० आणि ८० च्या दशकातील गाणी आजही तेवढ्याच आस्वाद घेत आपण ऐकतो आणि नवी पिढी देखील ऐकते. त्यांच्या शेवटच्या काळात “परिंदा” या चित्रपटातील “तुमसे मिलके, ऐसा लगा तुमसे मिलके” हे गीत असेल अथवा “१९४२-अ लव्ह स्टोरी” मधील “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” हि सगळीच गाणी बऱ्याच कालावधी नंतर बरीच लोकप्रिय ठरली. १९८८ साली पंचमदा ना एक हृदय विकाराचा झटका आला होता त्यावर उपचार घेणेसाठी ते लंडन मधील एका हॉस्पिटल मध्ये भरती होते तेंव्हा देखील त्यांनी अनेक ट्युन्स कम्पोज केल्या पण दुर्दैवाने त्यातील एकही आपल्या पर्यंत आली नाही, प्रकाशित झाली नाही. १९६१ मध्ये “छोटे नवाब” पासून संगीतकार म्हणून सुरु झालेला प्रवास १९९४ साली१९४२ एक लव्ह स्टोरी” ला थांबला...तसपाहता हा चित्रपट पंचम यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला, याचं संगीत नंतर अनु मलिक यांनी पूर्ण केल.

 

आमच्या पिढीच्या भाव-विश्वास समृद्ध करणाऱ्या या अवलिया संगीतकारास त्याच्या जन्मदिनी सलाम ! 

“यादों की बारात निकली है, आज दिल के द्वारे”

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

यु-ट्यूब: AMIT KAMATKAR


इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?