छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स
आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा साजरा करीत असताना आपण महाराजांकडून विविध कौशल्य शिकून त्यानुसार राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास पुढे यावे. जयंती साजरी करताना आपण त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मला वाटते. महाराजांकडे पहावं आणि शिकावं , स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला पण हे करीत असताना जी जीवनावश्यक कौशल्य महाराजांनी आपणास दिली त्याच अनुसरणं करावं. श्री समर्थ रामदासस्वामींनी महाराजां विषयी भावना व्यक्त करताना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत- निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी. संस्कृतीचा आदर करा: छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मराठी आणि संस्कृत या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. आपली संस्कृती टिकविण्यासाठी स्थानिक भाषेचे महत्व महाराजांनी अधोरेखित केले आहे. सोबतच समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद सुलभ होण्यास यामुळे मदत मिळाली. नाविण्यपूर्