ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?
संगणकीय जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवे नवे प्रयोग करताना आता आपल्याला पहायला आणि अनुभवाला मिळत आहे. येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होवू शकेल अस वाटते. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा जिथे गरज असेल ते क्षेत्र ! सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा हा डेटाच असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाला मिळालेली नवी देणगी आहे याच्या जोरावर बरेच प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तस पाहिलं तर आरोग्यसेवा हि मनुष्यबळावर अवलंबून आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यरीत्या वापरली गेल्यास, या क्षेत्रास त्याचा खूप मोठा फायदा होताना पहायला मिळेल. संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांची एक टीमच या विषयावर कार्यरत आहे नक्कीच हि मंडळी एका नव्या ए.आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या अव