झेप- मुलं मोठी होतात
आयुष्याच्या
वाटेवर चालत असताना काळ कसा सरतो समजत नाही, ‘काळच’ बऱ्याच गोष्टीवर मलम असतो,
सोल्यूशन असतं अर्थात याची उपरती प्रौढ झाल्यावर होते आणि तो आजचा विषयही नाही.
बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धावस्था अशा अवस्थेतून वाटचाल, म्हंटल तर
“दिव्य” म्हंटल तर “आनंद”, प्रत्येकजण यास कसे पाहतो त्यावर सारं अवलंबून असतं असं
म्हणावं लागेल. वडील आणि आई यांच्या छत्र छायेत दिवस मजेत सरत असतात ते कधीच संपू
नयेत असे प्रत्येकास वाटते, पण तुम्ही जबाबदारी घेण्यास सक्षम होता – तुम्ही सक्षम
झालात हे ठरवायचं कसे? याचं कोणतच मापक , दंडक नाही. आजच्या जमान्यात शहरा -शहरा
परत्वे मुलांचे संगोपन यात बदल होत आहेत. मुलांना मिळणाऱ्या सुविधा, सभोवतालचे
वातावरण यावर बरचं काही अवलंबून असतं. आयुष्यात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध
वळणावर निर्णायक टप्पे येतात त्याकडे पाहण्याचा विविध शहरातील मुलांचा दृष्टिकोन
बदलतो आहे. याकडे एक पालक म्हणून पाहताना भिती वाटते, पण मुलांमध्ये दिसणारा
आत्मविश्वास आश्वस्थ करतो की ही मंडळी काहीतरी वेगळ करून दाखवतील.
मुलं मोठी होतात, काळ एवढा लवकर सरतो की
आपल्या लक्षातही येत नाही, अगदी काल पर्यन्त परसबागेत बागडणारी मुलं, छोटीशी पिलं उडण्यास
तत्पर होतात, कधी भरारी घेऊ असे काहीसे त्यांना वाटू लागलेले असते. पंखात बळ नसतं
पण उडण्याची मनाची तयारी झालेली असते. अर्थात हे एक पालक म्हणून आपल्यालाच वाटत
असते, या ठिकाणी आत्मविश्वास खूप कामाचा, किशोरवयीन मुलांना विविध उद्दिष्ट खुणावू
लागतात त्यामुळे त्यांची भरारी घेण्याची मानसिकता झालेली असते. आई वडीलांना मूल हे
कितीही मोठे झाले तरी लहानच असतं पण बाल्यावस्था संपते आणि मुलं किशोरावस्थापर्यन्त
कधी पोहोचतात समजतच नाही, अर्थात असे होणारा काही मी एकटाच पालक नाही, ही भावना
संगळ्यांचीच असावी, नव्हे असतेच !! या भाव-भावनांच्या खेळातच आम्ही मोठे झालो,
आमची पिढी (खरं तर मी भावनिक असे म्हणायचे आहे) भावनिक , पण आताची मुलं प्रॅक्टिकल
आहेत, फारसे भावनां मध्ये अडकत नाहीत, पण आज यां लेखात अशीच एक भावनिक आठवण शेअर
करावी वाटते-
मला आठवतं ई.१० वी बोर्ड परीक्षा होती, पहिलाच मराठीचा पेपर, सकाळी ११ ची वेळ, परीक्षेस सोडवायला बाबा येणार होते, त्याप्रमाणे तयारी झाली, मी बाबांना नमस्कार केला आणि पाहतो तर काय तर अचानक बाबांच्या डोळ्यात पाणी आलं,मी विचारलं काय झालं बाबा? पण बाबा काहीच बोलले नाहीत, मी विचारात पडलो पण परीक्षेस जायचं असल्याने अथवा घडलेल्या घटनेच फारसं गांभीर्य नव्हतं, असेच म्हणावे लागेल !! पण बाबांच्या डोळ्यात पाणी का आलं? याचं उत्तर मला काळाने दिलं असचं म्हणाव लागेल. माझ्या मुलाचं, आदित्यचं या वर्षी दहावीच वर्ष ! हिस्टरी रिपीटस् मुलगा मोठा झाला याचा आनंदचं आणि डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविकच !! मला वाटतं बाबांनाही असचं काहीसं वाटलं असावं , अर्थात हा सारा अंदाजच !
आज आदित्यचा वाढदिवस आणि आठवणींचा डोलारा , म्हणूनच हा भावनांचा लेख प्रपंच.
अमित बाळकृष्ण कामतकर
It’s an amazing experience to raise the kids
उत्तर द्याहटवा