संगणक प्रशिक्षणाचा रौप्य महोत्सव – विद्या कॉम्प्युटर्स
आज पर्यन्तचा प्रवास काही सोपा नव्हता, २५ वर्षे मार्केट मध्ये टिकून राहायचं , स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं ही काही साधी बाब नाही. अवघ्या दोन संगणकावर (286 & 386 प्रोसेसर) आणि ८० चौ. फुटाच्या हॉल मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २६ संगणक (आय-7, आय-3 प्रोसेसर) आणि २००० चौ. फुटाच्या स्व-मालकीच्या जागेत “जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था” असे बिरुद मानाने मिरवीत सुरू आहे. संगणक शिक्षण देणारी संस्था ते दर्जेदार संगणक शिक्षण देणारी आणि करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक मिळविणे, पालक आणि विद्यार्थी यांच्या विश्वासास पात्र ठरणे कधीच सहज शक्य नव्हते. सोलापुरात संगणक प्रशिक्षण देण्याच्या एस.ओ.पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) डिफाईन करणारे विद्या कॉम्प्युटर्स हे प्रथम संगणक प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी प्रत्येक कोर्स साठी विशिष्ट प्रशिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली गेली, प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याने किमान व्यावहारिक गोष्टींचा सराव करणे अनिवार्य करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी मित्र