संगणक प्रशिक्षणाचा रौप्य महोत्सव – विद्या कॉम्प्युटर्स
आज पर्यन्तचा प्रवास काही सोपा नव्हता, २५ वर्षे मार्केट मध्ये टिकून राहायचं, स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं ही काही साधी बाब नाही. अवघ्या दोन संगणकावर (286 & 386 प्रोसेसर) आणि ८० चौ. फुटाच्या हॉल मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २६ संगणक (आय-7, आय-3 प्रोसेसर) आणि २००० चौ. फुटाच्या स्व-मालकीच्या जागेत “जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था” असे बिरुद मानाने मिरवीत सुरू आहे. संगणक शिक्षण देणारी संस्था ते दर्जेदार संगणक शिक्षण देणारी आणि करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक मिळविणे, पालक आणि विद्यार्थी यांच्या विश्वासास पात्र ठरणे कधीच सहज शक्य नव्हते. सोलापुरात संगणक प्रशिक्षण देण्याच्या एस.ओ.पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) डिफाईन करणारे विद्या कॉम्प्युटर्स हे प्रथम संगणक प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी प्रत्येक कोर्स साठी विशिष्ट प्रशिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली गेली, प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याने किमान व्यावहारिक गोष्टींचा सराव करणे अनिवार्य करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी मित्रांचा सराव उत्तम झाला आणि विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास वृद्धिंगत होण्यास मदत मिळाली.
स्टार्टअप हा शब्द आज सर्वश्रुत आहे पण २५ वर्षापूर्वी याची सुरुवात करणं आणि नाव लौकिक कमविणे यात यश सामाविले आहे. मला आठवतं विद्या कॉम्प्युटर्सच्या स्थापने पासून सलग ०७ वर्षे कोणताही नावाजलेला ब्रॅंड सोबतीला घेतला नाही फक्त विद्या कॉम्प्युटर्स हे नाव जनमानसात रुजविण्याचे कार्य अविरत केले, यास त्याकाळी प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडिया ने साथ दिली. जाहिरात एजन्सि
ज्यांच्या सोबत विद्या कॉम्प्युटर्स जोडले गेले त्यांनी आम्हास भरपूर सहकार्य केलं. तसे पाहिले तर कोणत्याही ब्रॅंड शिवाय सात वर्षे बाजारात टिकून राहणे, अनेक विद्यार्थ्यां पर्यन्त पोहोचणे म्हणजे एक दिव्यच होत, पण ते साध्य करू शकलो, ते फक्त आणि फक्त शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर !! जुळे सोलापुरात अनेक पालकांच्या मनात स्थान निर्माण करण्याची ती एक संधी होती जी आम्ही जाणली आणि त्या संधीचा आव्हान म्हणून स्विकार केला. मला हे नमूद करताना आनंद होतो आहे की हे आव्हान पेलण्यात विद्या कॉम्प्युटर्स यशस्वी झालं. त्या सात वर्षात आणि त्यानंतर आज पर्यन्त देखील !!एका पिढीस संगणक साक्षर आणि सक्षम केल्यानंतर विद्या कॉम्प्युटर्सकडे संगणक शिक्षण घेण्यास आता दुसरी पिढी येते आहे, कोणत्याही व्यवसायात ही सर्वात मोठी अचिवमेंट मानली जाते. प्रथम पिढीस जी शैक्षणिक गुणवत्ता मिळाली तीच किंबहुना बदलत्या नव्या तंत्रज्ञाना नुसार, काळानुरूप त्याही पेक्षा जास्त उत्तम गुणवत्ता देण्याचा विद्या कॉम्प्युटर्सचा कायम प्रयत्न राहिला आहे आणि या पुढे ही राहील. हा मान आम्हाला- अर्थातच विद्या कॉम्प्युटर्सला दिल्या बद्दल आम्ही पालक- विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करतो. या प्रवासात आम्हास बेस्ट अॅकडमिक परफॉर्मेंस, बेस्ट सोशल मीडिया मार्केटिंग, बेस्ट अँड युनिक प्रॅक्टिस फॉर अॅकडमिक, बेस्ट क्लिक प्रवेश, अशा विविध पुरस्काराने विविध संस्था मार्फत सन्मानित करण्यात आलं. युवा पिढीस उत्तम व्यासपीठ देणे हेतु तृतीय वर्धापन दिना निमित्त जिल्हा स्तरीय डान्स स्पर्धां आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सोलापुरातील “सुशील रसिक सभागृह” या मोठ्या सभागृहात आयोजित करण्यात आली, या स्पर्धेस सोलापूरकरांनी खूप मोठा प्रतिसाद दिला.
त्यानंतर चतुर्थ वर्धापन दिनास महाराष्ट्राचे हास्य-सम्राट श्री दीपक देशपांडे सर यांचा “हास्य-कल्लोळ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास देखील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्या कॉम्प्युटर्स नेहमीच वेग-वेगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतं, या मध्ये मातृ-दिना निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे खास महत्व आहे. कारण तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या आईस संगणक शिकवितात. या अॅक्टिविटीची नोंद महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे यांनी देखील घेतलेली आहे. कलागुणांना वाव देण्या करिता वर्धापन दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन तर होतेच पण सोबतच वर्षभर विविध स्पर्धां भरविल्या जातात, ज्या मध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, सी प्रोग्राम, कॅलिग्राफी, पोस्टर स्पर्धा (पेन्सिल स्केच, विविध अॅप वापरुन), रांगोळी, वक्तृत्व, स्टार्टअप कल्पना मांडणे व सादरीकरण, उत्तम मार्केटिंग कल्पना अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया या दोन्ही गोष्टीं या प्रवासात सदैव आमच्या सोबत होत्या, त्याची कमतरता कधीच आम्हाला पडली नाही. विद्या कॉम्प्युटर्सच्या तप-पूर्ती च्या निमित्ताने जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये एका प्रतिष्ठित कंपनीचे इनबाउंड प्रोसेस साठी मुलाखती घेण्यात आल्या व या प्रक्रिये मधून सोलापुरातील पाच विद्यार्थ्याना बंगळुरू येथे जॉब मिळाला. सोलापुरातील युवक वर्गास स्टार्टअप इन्क्यूबेशन सपोर्ट मिळावा या हेतूने पुणे स्थित थिंकट्रान्स फाउंडेशन या कंपनी सोबत करार करून याचे कार्य देखील मागील तीन वर्षांपासून विद्या कॉम्प्युटर्स करीत आहे.सॉफ्ट स्किलची गरज ओळखून
विद्या कॉम्प्युटर्स ने “आदित्य स्किल ट्रेनिंग युनिट”ची सुरुवात केली या मध्ये
प्रामुख्याने जॉब रेडी सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले.
सोबतच व्यक्तिमत्व विकास (विद्यार्थी व कर्मचारी वर्गांसाठी), व्यवसाय वृद्धीसाठी
कर्मचारी प्रशिक्षण, संभाषण कौशल्य अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला. या
माध्यमातून पुणे, सोलापूर, लातूर, हिंगोली, परभणी, वसमत इ. ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या.
संगणकीय ज्ञानातून
फलदायी काम या मार्गदर्शक सूत्राचे पालन करीत विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात
येतं. MS-CIT आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठा अंतर्गत क्लिक कोर्सेस साठी जुळे सोलापुरात केवळ विद्या कॉम्प्युटर्स
हेच मान्यताप्राप्त संगणक अधिकृत केंद्र आहे. प्रशस्त लेक्चर हॉल, शिकविण्यासाठी
LCD TV (टेलिव्हिजन सेट) तसेच उच्च शिक्षित शिक्षक वर्ग जोडीला तेवढीच प्रशस्त
संगणक लॅब ज्या मध्ये सरावासाठी वैयक्तिक संगणक, लायब्ररी आणि व्यावहारिक संगणक
वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले असायनमेंट सेट जे फक्त विद्या कॉम्प्युटर्स मध्येच
विद्यार्थ्यास मिळतात या सर्व बाबींमुळे जुळे सोलापुरात
विद्यार्थी आणि पालक यांनी संगणक शिकायचा तर विद्या कॉम्प्युटर्स मध्येच असा निर्धार केलेला या २५ वर्षात आम्हास पहावयास
मिळाला आहे.
रौप्य महोत्सवी
वर्षारंभा निमित्त संचालक म्हणून मी सर्व पालक, विद्यार्थी , आमचे स्टाफ मेंबर्स,
मित्र, हितचिंतक आमच्यावर विश्वास ठेवणारे सोलापूरकर या सर्वांचे मन:पूर्वक आभार
व्यक्त करतो. जानेवारी २०२४ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षारंभा निमित्त नवीन
बोध-चिन्हाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. मी आपणां सर्वाना विंनती करतो की आपण
विद्या कॉम्प्युटर्सचे फेसबुक पेज
(vidyacompforyou) लेटेस्ट अपडेट साठी फॉलो करावे. विद्या
कॉम्प्युटर्स ने सदैव कालानुरूप बदल करीत संगणक प्रशिक्षणाची नव-नवीन दालने
विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिली आहेत. संगणक आणि करिअर शिक्षणाची ज्ञानगंगा
विद्यार्थ्यां पर्यन्त पोहोचविण्याचे सेवाव्रत अंगिकारल्यामुळे आज विद्या
कॉम्प्युटर्स मध्ये विद्यार्थी प्रमाणपत्र ते जॉब रेडी अथवा स्वयं-रोजगार
निर्मितीक्षम होण्याच्या प्रवासाची अनुभूती घेऊ शकतो. विविध कोर्सेसचे प्रवेश देणे सुरू आहे तरी इच्छुक
विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्यास संपर्क करावा – विद्या कॉम्प्युटर्स, प्लॉट नं २,
श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज रोड, जुळे सोलापूर – मोबाइल- 9422066287.
अमित बाळकृष्ण कामतकर
संचालक- विद्या कॉम्प्युटर्स
ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता,
सॉफ्ट स्किल ट्रेनर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा