पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

ब्रॅंडींग लीडरशिप

इमेज
  नेतृत्व गुण हा उपजत असणारा गुण म्हणून आपण पाहतो, ऐकतो, बऱ्याच वेळा आपण सहज म्हणून जातो की लहानपणा पासूनच त्याच्यात / तिच्यात नेतृत्वाची चुणूक आहे. पण आता असे नाही, नोकरी करीत असताना अथवा स्वत:चा व्यवसाय करीत असताना तुम्हाला नेतृत्व हे करावे लागेल आणि त्याच्या अनुषंगाने आवश्यक गुण आत्मसात करावे लागतील, शिकावे लागतील. आज समाजात उत्तम नेतृत्व करणाऱ्या मंडळींची वानवा दिसते. पण नोकरी करीत असताना बढती मिळते (प्रमोशन मिळते), स्वत;चा व्यवसाय सुरू केला असेल तर आशा ठिकाणी   गुणांचा कस लागतो असे माझे मत आहे. विविध टप्प्यावर तुमची निर्णय घेण्याची क्षमता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सर्व समावेशक विचार, आत्मविश्वास, सहानुभूति, अनुकंपा/ कणव, सचोटी , शिकण्याची इच्छा ही गुण वैशिष्ट्य खूप महत्वाची वाटतात मला. यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता ही अनेक वेळा नेत्याच्या धोरणात्मक निर्णय घेणे , अभिप्राय ऐकणे, संघास प्रेरित करणे आणि कार्यसंघात योगदान कशा प्रकारे देऊ करतात यावर अवलंबून असते. आज आपण देशाचा विचार करीत असू तर फक्त "नेतृत्व" असे राहिले नाही, त्यास मी नेतृत्व 2.0 म्हणेन कारण आता ती फक्त लीडरशिप...