पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्यवसायाची निवड आणि आवड

इमेज
  व्यवसायाची निवड आणि आवड या दोन्ही गोष्टी एकास एक संगती या प्रमाणे आहेत. व्यवसायाची आवड असल्यास निवड योग्य होवू शकते आणि व्यवसायाची निवड योग्य असल्यास त्यात आवड निर्माण होणे हे क्रमप्राप्त होते. बऱ्याच वेळा व्यवसाय हा ना-इलाज म्हणून स्विकारणारी काही मंडळी असतात, अशा परिस्थितीत व्यावसायिकता येणे खूप कठीण असतं, अर्थात हे विविध उदाहरणाने सिद्ध करता येऊ शकते, आज तो विषय नाही म्हणून मी त्यावर प्रकाश नाही टाकत. पण व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की “व्यावसायिकतेचा पोशाख” हा घालावाच लागेल. व्यवसायाची निवड करीत असताना सामाजिक गरज (मागणी) या विषयाकडे पाहणे मला जास्त योग्य वाटते, समाजास काय हवं आहे, कशाची मागणी होत आहे ते सहज उपलब्ध करता येऊ शकतं का? त्यावर व्यवसाय करता येऊ शकेल का? त्यातून नवोन्मेश साध्य करता आला तर म्हणतात ना सोन्याहून पिवळं !! अगदी तसच काही..... व्यवसायास करिअर म्हणून निवडताना मला आवडत, मला जमतं आणि समाजास त्याची गरज (मागणी) आहे हि त्रिसूत्री लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याची काळजी घेतली तर निवड कधीच चुकणार नाही आणि तुमचं व्यवसायात यशस्वी होणं पक्क म्हणून