पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

अँग्री यंग मेन

इमेज
  “आज ! खुश तो बहोत होगे तुम” हा डायलॉगच एवढा दमदार आहे, की तो चित्रपटगृहांत ज्याने कोणी पाहिला तो त्या शॉट वर फिदा झाला नाही, तर नवलचं !! ही संवाद लेखकाची जादू तर आहेच पण तो ज्या ताकदीने अमितजींनी सादर केला आहे त्यास आजतागायत तोड नाही. ७० च्या दशका पासून ते अगदी ९० च्या दशका पर्यन्त कथा, पटकथा आणि संवाद यावर मजबूत पकड असणारे दोन मित्र ! ज्यानी बॉलीवूडला अनेक हिट्स, सुपर डुपर हिट्स चित्रपट दिले,  अनेकांचे संसार या जोडीमुळे उभे राहिले, हो संसार ! आजही ही मंडळीनी “शो” ची तिकटे सांभाळून ठेवलेली आहेत. ज्यावर त्यांची पहिली कमाई झाली , ती तिकिटे !! थोड आश्चर्य नक्कीच वाटेल पण खरं आहे. तर, दमदार संवाद, कथा आणि पटकथा याचे धनी सलीम-जावेद, यांनी चित्रपटात अनेक प्रयोग केले. “ अँग्री यंग  मॅन ” हे बिरुद अमितजीना यांच्या मुळेच मिळालं ! प्रकाश मेहरा यांना “जंजीर”च कथानक आवडलं पण या कथेत चित्रपटाच्या नायकास एकही गाणं नव्हतं, (संगीत प्रधान चित्रपटांचा काळ) त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी “जंजीर” नाकरला होता. त्यातच एके दिवशी महमुद यांचा “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सलीम-जावेद ह्या