एआय शिक्षकांची जागा घेईल ?

“माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे “हात” धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, हा संदेश कदाचित तुम्ही देखील वाचला असेल, आताच युग हे एआय (आर्टिफिश्यल इंटेलिजेंसच) युग, बऱ्याच गोष्टी एआय मुळे बदलत आहेत. पण खरच एआय शिक्षकांची जागा घेऊ शकेल? हा प्रश्न बरेच दिवस मनात घोळतो आहे, कारण पहा “जनरेटीव एआय” ने खूप कमाल केली आहे. एका कंपनीचे अथवा स्वत:चे प्रॉफिट लॉस शिट वाचण्याचे तंत्र प्रत्येकास आत्मसात असतेच असे नाही, आता जनरेटीव एआयला हा प्रश्न विचारला तर लागलीच पूर्ण प्रॉफिट लॉस शिट एआय समजावून सांगेल. तेही काही क्षणात आणि अगदी तुम्ही म्हणाल त्या भाषेत !! मग ही कमालच म्हणावी लागेल. अगदी ह्याच प्रकारे कायदेशीर, वैद्यकीय सल्ला देखील एआय देऊ करीत आहे. अर्थात त्याच्याकडील डेटाच्या आधारेच हे सारं सुरू आहे. माणसाने मशीन्सना पुरविलेल्या माहितीच्या आधारे अनेक अचंबित करणारे निकाल एआय देऊ करीत आहे. काही ठिकाणची जॉब्स जातील तर काही जॉब्स नव्याने तयार होतील. जॉबची नावे बदलतील या साऱ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत हे नक्की ! आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंटेरनेटच्या मायाजाळात माहिती सह...