पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

5G तंत्रज्ञान: इंटरनेटच्या पुढच्या क्रांतीची संपूर्ण मार्गदर्शिका

इमेज
 5G तंत्रज्ञान: इंटरनेटच्या पुढील क्रांतीचे संपूर्ण विश्लेषण 5G म्हणजे पाचव्या पिढीचे मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञान जे 4G पेक्षा 10 ते 100 पट अधिक वेग, 1 मिलीसेकंदापर्यंत कमी लेटन्सी आणि मोठ्या प्रमाणात डिव्हाइस-कनेक्टिव्हिटी प्रदान करते. हे IoT, AI, स्वयंचलित वाहने, स्मार्ट शहरे आणि क्लाऊड-आधारित सेवांना गती देणारे भविष्याचे नेटवर्क आहे. आजच्या जमान्यात संपर्कात राहण्याचा खात्रीशीर मार्ग अर्थात इंटरनेट , कनेक्टीव्हिटी हा काही नवीन विषय नाही , 1969 मध्ये इंटरनेटला सुरुवात झाली हे आपण जाणतोच, नेटवर्क मध्ये संगणक जोडणे आणि मेसेज पाठविणे हा मुख्य उद्देश घेऊन झालेली सुरुवात आज विविध कारणांसाठी याचा वापर होताना आपण पहात आहोत. मुख्यत्वे करमणूक त्यानंतर सर्च करणे, इ-कॉमर्स , शिक्षण, संवाद, आदी कारणांसाठी इंटरनेट वापरलं जातं. तंत्रज्ञान जसं प्रगत होत गेलं तशा त्याच्या पिढ्या देखील प्रगत होत गेल्या जसे की 1980 मध्ये 1 G , 1990-2 G , 2000-3 G , 2010-4 G आणि आता 5 G , खरंच डायल अप इंटरनेट सुविधे मध्ये एक मेसेज रिसीव करण्यास ४५ सेकंद लागायचे हा वेळ कमी होत 4 G मध्ये 0.32 सेकंद एवढा कमी झाला आणि...