स्मार्ट फोन खरेदी करायचा आहे, पण कोणता ?
अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असे आपण म्हणत असू , तो काळ आता संपला, या गरजासोबत अजून एक गरज आजच्या युगात नित्याची बनली आहे ती म्हणजे मोबईल फोन !! “स्मार्ट फोन” आता प्राथमिक गरजा मध्ये आपले स्थान भक्कम करू लागला आहे. नुसता मोबईल फोन असण्यापेक्षा तो “स्मार्ट फोन” असणं प्रतिष्ठेच मानल जात किंबहुना प्रतिष्ठेच झाल आहे. पण बऱ्याच वेळा हा स्मार्ट फोन घ्यायचा कुठला, कोणता त्याचे स्पेसिफिकेशन (तपशील) कसे पहायचे ? कोणते ते कसे ठरवायचे हे माहिती नसल्याने आपण आपल्या पहाण्यात जो स्मार्ट फोन आलेला असतो तोच खरेदी करतो. आज आपण जाणून घेवूयात स्मार्ट फोन खरेदी करताना त्याचे स्पेसिफिकेशन्स सुद्धा कसे महत्वाचे असतात. प्रोसेसर : स्मार्ट फोन मध्ये विविध प्रोसेसर येतात.त्यामध्ये ड्युअल कोअर थोड्या कमी किमतीत उपलब्ध होवू शकतात. नाहीतर ओक्टा कोअर अधिक किमतीत उपलब्ध आहेत.स्मार्ट फोन घेण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे एका वेळी अनेक कार्य (मल्टी-टास्किंग) करता यावीत. एका अप्लिकेशन मधून दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये सहज जाता यावं हाही उद्देश स्मार्ट फोन घेताना असतो.चांगल्या आणि अधिक स्पीड