फॉलोअर

संगणकावर फोटो अल्बम तयार करणे




फोटो अल्बम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय कारण त्यात आठवणी गुंतलेल्या असतात. भाव भावनांचे अनोख नात दडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकास त्याच महत्व नेहमी वेगळच असतं. मग असा हा अल्बम सॉफ्ट कॉपी (प्रिंट काढायची नाही) मध्ये तयार करणे यात काही औरच मजा आहे !! फोटो अल्बम तयार करण्यासाठी खूप सारे रेडीमेड सॉफ्टवेअर तुम्हाला सहज उपलब्ध होतीलही पण तुम्हास माहिती आहे का असा फोटो अल्बम आपल्याला पॉवरपॉईंट मध्ये अगदी सहज करता येतो. चला तर मग जाणून घेवू फोटो अल्बम कसा तयार करायचा ?
            मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट २०१० असेल अथवा २०१३ असेल या दोन्ही आवृत्या मध्ये आपण फोटो अल्बम तयार करू शकतो. यासाठी गरज आहे ती आपल्या डिजिटल कॅमेरातील फोटो आपल्या कॉम्प्युटर वर घेण्याची त्यासाठी तुमच्या कॅमेराची USB केबल जोडा व सर्व फोटोज कॉपी करून तुमच्या कॉम्प्युटर च्या सी ड्राइव्ह सोडून इतर कोणत्याही ड्राइव्ह किंवा फोल्डर मध्ये पेस्ट करा. अथवा तुम्हाला थेट तुमच्या कॅमेरा वरून सुद्धा घेता येतील. त्या नंतर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट ओपन करा आणि त्यातील इन्सर्ट टॅब क्लिक करा व त्यातील फोटो अल्बम यावर क्लिक करा, तिथे तुम्हास २ पर्याय दिसतील. १) New Photo Album २) Edit Photo Album त्यापैकी पहिला पर्याय निवडा.
            पॉवरपॉईंट तुम्हास फाईल / डिस्क  असा पर्याय दाखवेल यावर क्लिक करा आणि तुमचे फोटोज सिलेक्ट करा आणि इन्सर्ट या बटणावर क्लिक करा. तुम्हास तुमचे सर्व फोटोज आता अल्बम लिस्ट मध्ये दिसतील. तुम्हास लेआऊट फोटो साईज मध्ये हवा आहे कि स्लाईड साईज मध्ये ते तुम्हास ठरवता येईल.

शक्यतो स्लाईड साईज ठेवावा म्हणजे अल्बम दिसावयास छान दिसतो. तुम्हास तुमच्या अल्बम ला काही नवीन टेक्स्ट (एखादे टायटल, कॅप्शन) द्यायचे असल्यास इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स हा पर्याय निवडा. फोटोज अॅड करून झाल्यानंतर क्रिएट या बटणावर क्लिक करा तुमचा फोटो अल्बम तयार !! अहो पण थोड थांबा, या अल्बम ला आपल्याला ट्रांझिशन दिलेले नाहीत तेही देवूयात,ट्रांझिशन देण्यासाठी ट्रांझिशन टॅब वर क्लिक करा आणि त्या मधून तुम्हास आवडणारे इफेक्ट्स निवडा व स्लाईड ला अप्लाय करा. प्रत्येक स्लाईड ला वेग वेगळे इफेक्ट्स सुद्धा देता येतील. ट्रांझिशन  टॅब वर क्लिक करा व प्रत्येक स्लाईड ला वेळ द्या त्यामुळे प्रत्येक स्लाईड ठराविक वेळ स्क्रीन वर आपल्याला पाहता येईल. ट्रांझिशन व वेळ  अप्लाय केल्यावर स्लाईड टॅब वर क्लिक करा आणि “फ्रॉम बिगिनिंग” हा पर्याय निवडा...आणि तुमचा फोटो अल्बम तयार !!!  

आनंद घ्या तुमच्या आठवणींचा फोटो अल्बम सह !!!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

अधिक माहिती साठी VIDYA COMPUTERS इथे क्लिक करा "गेट कोट" वरील फॉर्म भरावा. विद्या कॉम्प्युटर्स  संपर्क करेल आणि पूर्ण माहिती देईल (मोफत सेवा). 





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

छावा

ब्रॅंडींग लीडरशिप