फॉलोअर

स्मार्ट फोन खरेदी करायचा आहे, पण कोणता ?



अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असे आपण म्हणत असू , तो काळ आता संपला, या गरजासोबत अजून एक गरज आजच्या युगात नित्याची बनली आहे ती म्हणजे मोबईल फोन !! “स्मार्ट फोन” आता प्राथमिक गरजा मध्ये आपले स्थान भक्कम करू लागला आहे. नुसता मोबईल फोन असण्यापेक्षा तो “स्मार्ट फोन” असणं प्रतिष्ठेच मानल जात किंबहुना प्रतिष्ठेच झाल आहे. पण बऱ्याच वेळा हा स्मार्ट फोन घ्यायचा कुठला, कोणता त्याचे स्पेसिफिकेशन (तपशील) कसे पहायचे ? कोणते ते कसे ठरवायचे हे माहिती नसल्याने आपण आपल्या पहाण्यात जो स्मार्ट फोन आलेला असतो तोच खरेदी करतो. आज आपण जाणून घेवूयात स्मार्ट फोन खरेदी करताना त्याचे स्पेसिफिकेशन्स सुद्धा कसे महत्वाचे असतात.

प्रोसेसर : स्मार्ट फोन मध्ये विविध प्रोसेसर येतात.त्यामध्ये ड्युअल कोअर थोड्या कमी किमतीत उपलब्ध होवू शकतात. नाहीतर ओक्टा कोअर अधिक किमतीत उपलब्ध आहेत.स्मार्ट फोन घेण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे एका वेळी अनेक कार्य (मल्टी-टास्किंग) करता यावीत. एका अप्लिकेशन मधून दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये सहज जाता यावं हाही उद्देश स्मार्ट फोन घेताना असतो.चांगल्या आणि अधिक स्पीड असणाऱ्या प्रोसेसर मुळे अप्लीकेशन्स सुरु होणे आणि मेमरी मध्ये लोड होणे या दोन्ही बाबी सहज साध्य होतात, लवकर होतात. ओक्टा कोअर प्रोसेसर असणारे फोन्स उत्कृष्ठ कामगिरी पार पाडत आहेत असा अनुभव आहे.

रॅम: फोन ची रॅम तुम्हाला विविध एप्स फोन चा स्पीड कमी न करता उघडायला मदत करते. जेवढी रॅम जास्त असेल त्या अनुषंगाने सुखद मल्टी-टास्किंग अनुभवता येते. साधारण 1GB (गिगा बाईट) रॅम चांगल्या प्रकारचा मल्टी-टास्किंग अनुभव देवू शकते.

प्रोसेसर आणि रॅम : योग्य प्रकारचे कॉम्बिनेशन चांगला अनुभव देवू शकतात. जसे क्वाड कोअर प्रोसेसर सोबत 1GB  रॅम चांगल्या प्रकारचा स्मार्ट फोन अनुभव देवू शकेल.

इतर बाबी : फोन खरेदी करताना इतर बाबी जसे ऑपरेटिंग सिस्टम, स्क्रीन साईज, डीझाईन, कॅमेरा,स्टोरेज,कनेक्टीव्हीटी, बॅटरी बॅक-अप ई बाबींचा विचार करणे योग्य.

स्क्रीन साईज: जर चित्रपट पाहणे, टीव्ही सीरिअल पाहणे यासाठी स्मार्ट फोन खरेदी करत असाल तर मग 720P म्हणजेच (1280 X 720 pixels)  ज्यास HD(हाय डेफिनेशन) रेडी असे म्हणतात असा फोन घ्यावा.

ऑपरेटिंग सिस्टम व बॅटरी बॅक-अप: ऑपरेटिंग सिस्टम निवडताना iOS अथवा अँऩ्डरोईड चीच निवड करा. विंडोज आणि ब्लॅकबेरी 10 अजून विकसित होत आहेत.स्मार्ट फोन निवडताना सोबत मायक्रो-SD कार्ड हा पर्याय आवर्जून निवडा यामुळे तुम्हास तुमचा डेटा व्यवस्थित स्टोअर करून ठेवता येईल. बॅटरी बॅक-अप सुद्धा खूप महत्वाचे आहे. कंपनी मानांकनानुसार बॅक-अप किती आहे याची तपासणी करा.

            स्मार्ट फोन खरेदी करताना वरील सर्व बाबींची खात्री करा आणि तुमच्या पैशांचा योग्य मोबदला मिळवा.

HAPPY PURCHASING !!

 
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?