ऑनलाइन बिल भरायचे आहे, पण कसे ?
रु.५०० व रु.१००० च्या नोटांवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर व्यवहार करणे कठीण झाले, असा अनुभव बऱ्याच मंडळीना आला असेल. लाइट बिल, फोन बिल, भरायचे कसे ? कारण पैसे बँकेच्या खात्यात भरायचे आणि काढायचे असतील तर रांगाच रांगा... या रांगेत उभे रहायला काही पर्याय आहे का अस सृष्टी आदित्यला विचारत होती. यावर आदित्य लागलीच म्हणाला, “अग सृष्टी, ऑनलाइन बिल भर ना !” तुझ्या बँकेच्या खात्यात पैसे आहेत ना आणि तुझ्या खात्यास इंटरनेट बँकिंग सुविधा आहे तर मग तू ऑनलाइन पेमेंट का करत नाहीस ? सृष्टी म्हणाली, “मला ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. आदित्य ने लागलीच सुचविले चल मी तुला शिकवितो ऑनलाइन पेमेंट कस करायचं, आदित्य ने MS-CIT चे प्रशिक्षण घेतलेले असल्याने ऑनलाइन पेमेंट गेटवे कसा वापरायचा हे त्यास माहिती होते. आदित्य ने लागलीच लॅपटॉप घेतला, इंटरनेट साठी मोडेम सुरु केला आणि सृष्टी ला सांगितल चल, आता ब्राऊजर (इंटरनेट एक्सप्लोरर, मोझीला फायरफोक्स, क्रोम ) सुरु कर. या ब्राऊजर मध्ये तुला फोन बिल भरायचे असल्यास तशी कंपनीची वेबसाईट उघड. उदा.www.bsnl.com या वेब साईट वर “पे युवर बिल” नावाची लिंक