ऑनलाइन आहात आणि व्यवहार करीत आहात- मग इकडे लक्ष द्या
इंटरनेट मुळे जग खूप जवळ
येत आहे.कोणतीही गोष्ट चुटकी सरशी (फक्त एका क्लिक वर) होते तेही घर बसल्या !! मग
बँकेत पैसे ट्रान्स्फर करणे असो अथवा खरेदी करणे असो सगळ अगदी सहज !! इंटरनेट चा
वाढता वापर आपल्याला आता नित्याचा झाला आहे पण ज्यावेळी आपण एखादा व्यवहार ऑनलाइन
करतो त्यावेळी नक्की कोणती काळजी घ्यावी हे जर लक्षात ठेवले तर आपली फसवणूक होणार
नाही. पण मग, काय व कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ? आज
मी तुम्हाला दहा बाबी सांगणार आहे त्या तुम्ही ध्यानात ठेवल्या तर ऑनलाइन व्यवहार
करणं सुरक्षित होईल.
1. वाय-फाय नेटवर्क वापर-
आजकाल वाय-फाय हॉट-स्पॉट सहज उपलब्ध होतात. तुम्ही जेंव्हा तुमच्या
स्मार्ट-फोन/लॅपटॉप वाय-फाय हॉट-स्पॉट ला कनेक्ट कराल तेंव्हा तो कोणाचा हॉट-स्पॉट
आहे त्याचे नाव काय, तो ओळखीचा आहे का ? याची खातरजमा करा मगच कनेक्ट व्हा अन्यथा
नको.
2. पासवर्ड- तुमचा पासवर्ड
सहज ओळखता येवू नये असा सेट करा.
3. पासवर्ड चा पुन:वापर- पासवर्ड
ठराविक अंतराळानंतर बदला आणि परत नवा पासवर्ड सेट करीत असताना पुन्हा तोच पासवर्ड
ठेवणे टाळा.
4. ई-मेल क्लिक टाळा- विविध
जाहिराती प्रसिद्धी साठी मेल पाठविण्यात येतात त्या मेल्सना रिप्लाय करणे टाळा.
5. लॉग-इन डीटेल्स- लॉग इन
डीटेल्स शेयर करणे टाळणे योग्य होते. युजरनेम पासवर्ड कोणासोबतही शेयर करू नका. तो लिहून ठेवल्यास सेफ कस्टडी मध्ये ठेवा.
6. ऑनलाइन स्टेट्स
सांभाळून- आजकाल आपण कुठे आहोत या बद्दल स्टेट्स ठेवणे हि फॅशन झाली आहे, जसे “हॉलिडे
एन्जॉय अॅट लालबाग” असे स्टेट्स सोशल मेडीयामध्ये ठेवल्यास तुम्ही कुठे आहात हे
मित्र परिवार सोडून इतर लोकांना देखील कळतं (पोस्ट करीत असताना काळजी घेतली नाही
तर) त्यामुळे असे स्टेट्स ठेवणे टाळा.
7. सोशल मेडिया सेटिंग्ज- बऱ्याच
वेळा सर्फिंग करीत असताना सोशल मेडिया सेटिंग्ज बद्दल ब्राऊजर वर मेसेज येतो आणि
आपण सहज “YES” वर क्लिक करतो. अशा मेसेजेस ला क्लिक करणे टाळा.
8. अनोळखी सेंडर- ई-मेल
द्वारे अनोळखी व्यक्तीच्या रिक्वेस्ट येतात, जाहिराती येतात, सोशल मेडिया वर
अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात त्यांना स्वीकारू नका.
9. सेफ ब्राऊजिंग- आपण
ऑनलाइन असताना तपासा कि वेब एड्रेस हा https:\\ ने सुरु झाला आहे का, तसे असल्यास
ऑनलाइन व्यवहार करा.
10. सेक्युरिटी सर्टिफिकेट-
प्रत्येक ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या साईट कडे हे सेक्युरिटी सर्टिफिकेट असतात. ते
तुम्ही पाहूही शकता, ते पाहण्यासाठी https:\\ च्या शेजारी बंद कुलुपाचे चित्र असते
तिथे क्लिक करा आणि तपासा.
या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)
सोलापूर
खूप महत्वाची माहिती दिली आहे , त्याबद्दल आभार ��
उत्तर द्याहटवाGood information with minimum words
उत्तर द्याहटवाVery important information sir
उत्तर द्याहटवाThanks for suggestions