ऑनलाइन बिल भरायचे आहे, पण कसे ?
रु.५०० व
रु.१००० च्या नोटांवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर व्यवहार करणे कठीण झाले,
असा अनुभव बऱ्याच मंडळीना आला असेल. लाइट बिल, फोन बिल, भरायचे कसे ? कारण पैसे
बँकेच्या खात्यात भरायचे आणि काढायचे
असतील तर रांगाच रांगा... या रांगेत उभे रहायला काही पर्याय आहे का अस सृष्टी आदित्यला
विचारत होती. यावर आदित्य लागलीच म्हणाला, “अग सृष्टी, ऑनलाइन बिल भर ना !” तुझ्या
बँकेच्या खात्यात पैसे आहेत ना आणि तुझ्या खात्यास इंटरनेट बँकिंग सुविधा आहे तर
मग तू ऑनलाइन पेमेंट का करत नाहीस ? सृष्टी म्हणाली, “मला ऑनलाइन पेमेंट करता येत
नाही. आदित्य ने लागलीच सुचविले चल मी तुला शिकवितो ऑनलाइन पेमेंट कस करायचं, आदित्य ने MS-CIT चे प्रशिक्षण
घेतलेले असल्याने ऑनलाइन पेमेंट गेटवे कसा वापरायचा हे त्यास माहिती होते.
आदित्य ने लागलीच लॅपटॉप घेतला, इंटरनेट
साठी मोडेम सुरु केला आणि सृष्टी ला सांगितल चल, आता ब्राऊजर (इंटरनेट एक्सप्लोरर,
मोझीला फायरफोक्स, क्रोम ) सुरु कर. या
ब्राऊजर मध्ये तुला फोन बिल भरायचे असल्यास तशी कंपनीची वेबसाईट उघड. उदा.www.bsnl.com
या वेब साईट वर “पे युवर बिल” नावाची लिंक असते तिथे लॅंन्ड-लाइन/ मोबाईल बिल
भरण्याच्या लिंक वर क्लिक केल्यास वेबसाईट तुम्हाला तुमचे डीटेल्स विचारेल, जसे
फोन नंबर, मोबाईल नंबर आणि कोड तुम्हास भरावा लागेल (captcha कोड तुमच्या स्क्रीन
वर दिसतो) आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यास वेबसाईट तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट
करायला सांगेल, तुमची बँक निवडल्यावर तुमच्या बँकेच्या पेमेंट गेटवेला वेबसाईट
जाईल व आता तुम्हाला युजर डीटेल्स, जसे कि लॉग इन (कस्टमर आयडी), पासवर्ड भरावा
लागेल. पेमेंट ला कन्फर्म
करताना तुमच्या बिलाच्या रकमेची खात्री करा आणि कन्फर्म बटणावर क्लिक करा, तुमचे
पेमेंट यशस्वी झाले कि लागलीच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तसा मेसेज येईल व स्क्रीन
वर पेमेंट सक्सेस असा मेसेज येईल. जर काही तांत्रिक अडचण आल्यास व पेमेंट अयशस्वी
झाले तरी घाबरू नका, तुमचे पैसे जास्तीत जास्त ३ कामाच्या दिवसात तुमच्या खात्याला
परत जमा होतात. पेमेंट यशस्वी झालेनंतर गरज असल्यास प्रिंट काढा अन्यथा तुम्ही
दिलेल्या ई-मेल वर सदर पावती येतेच.
अशा प्रकारे ऑनलाइन व्यवहार झाल्यावर
आदित्यने सृष्टीला विचारल, काय ग सृष्टी, लक्षात आल का? सृष्टी म्हणाली, थॅंक्स
आदित्य, पण सृष्टीला अजून एक शंका होती, ती आदित्यला म्हणाली, “अरे आदित्य मला
माझ्या बँकेत असलेल्या बाबांच्या अकाऊंटला पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर करता येतील का ?
आदित्य म्हणाला, हो का नाही करता येणार , चल तुला तेही शिकवितो, असे म्हणून
आदित्यने सृष्टीला ब्राऊजरची नवीन विंडो
उघडायला सांगितले कारण आपले व्यवहार पूर्ण झाले कि विंडो बंद करावी व परत नवी
उघडावी हे आदित्यला माहिती होते. त्यामुळे नवीन विंडो उघडून आदित्य सृष्टीला म्हणाला
तुझ्या बँकेचा वेबसाईट अॅड्रेस टाईप कर. उदा.onlinesbi.com, netbanking.hdfcbank.com/netbanking आणि इंटर
कि प्रेस कर. इथे महत्वाच आहे कि वेब अॅड्रेस हा https:// ने सुरु झालेला दिसायला
हवा व सोबत बंद कुलुपाचे चित्र दिसायला हवे. या नंतर तुमचा लॉग इन आयडी / कस्टमर
आयडी व पासवर्ड टाईप करा. (महत्वाच-लॉग इन आयडी व पासवर्ड कोणासोबत ही शेयर करू
नका) या नंतर “फंड ट्रान्स्फर” ला क्लिक केल्यास त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात
ट्रान्स्फर करायचे असल्यास खात्याचे डीटेल्स दया अथवा थर्ड पार्टी ट्रान्स्फर (दुसऱ्या
बँकेच्या तुमच्या/इतरांच्या खात्यात)
करायचे असल्यास तसा पर्याय निवडून माहिती भरा. नंतर सदर माहिती बँकेकडून खात्री
करण्यात येते व तुम्हाला तुमच्या इतर खात्यात घर बसल्या पैसे ट्रान्स्फर करता
येतात. काय सृष्टी आहे ना सहज आणि सोप्प !
आदित्य ने सृष्टीला शिकविले ऑनलाइन पेमेंट कसे करायचे, तुम्हाला काही अडचण असल्यास / शिकायचे असल्यास अथवा विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)
चला तर
मग, डिजिटल आयुष्याची सुरुवात करूयात !!
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
Explained in different angle with different way
उत्तर द्याहटवा