फॉलोअर

चॅट बॉट – मनोरंजक पण तितकच उपयोगी



चॅट बॉट एक नव कोर तंत्रज्ञान जे तुम्हाला इंटरनेट च्या सहाय्याने संवाद साधण्यासाठी तयार केलेले आहे. हा संगणक प्रोग्राम आहे. एका सर्व्हे द्वारे अस समोर आल आहे कि इंटरनेट युजर्स हे सोशल मेडिया साईटस् पेक्षा मेसेंजर चा वापर जास्त करतात. अगदी हाच धागा पकडून चॅट बॉट ची निर्मिती केली जात आहे. काही नियम व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून चॅट बॉट ची निर्मिती होत आहे. हि सेवा कोणत्याही सेवेशी जोडता येवू शकते जसे कि काही ठराविक टास्क पासून गमतीसाठी चॅट बॉट वापरता येवू शकतो. चॅट बॉट हे तंत्रज्ञान आता इंटरनेट वरील जवळपास सर्वच ठिकाणी वापरलं जातं. 
युजर्स सध्या विविध खरेदी ऑनलाईन करीत आहेत हि खरेदी करताना शक्यतो खरेदी करायची बाब ऑनलाईन सर्च केली जाते, त्या वेबसाईटवर ब्राउज केली जाते. साधारण पणे ती गोष्ट सापडत नाही

तोपर्यंत ती सर्च केली जाते, इथेच चॅट 
बॉट चा वापर करता येतो, एखाद्या ऑनलाईन स्टोअर ने जर चॅट बॉट तयार केली तर दुकानामध्ये ज्याप्रकारे सेल्समन सोबत बोलणे होते अगदी त्याचप्रमाणे चॅट बॉट वर संवाद होवू शकतो यामुळे खरेदी करण अधिक सोप होवू शकत. चॅट बॉट ची काही उदाहरणे पाहूयात.
वेदरबॉट – हवामान खात्याचा अंदाज लागलीच प्राप्त होतो.
ग्रोसरी बॉट- आठवड्यासाठी अथवा महिनावार किराणा ची ऑर्डर देता येईल.
न्यूज बॉट- चालू घडामोडी लागलीच कळतील.
लाईफ अॅड्व्हाइस बॉट – आयुष्यातील विविध अडचणींवर उपाय.
वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन
चॅट बॉट ची काही उदाहरणे :
यस बँक
एच.डी.एफ.सी. बँक ऑन चॅट
 फंड्स टायगर
यस एम पावर , गपशप  
चॅट बॉट तंत्रज्ञान आता काही भविष्य राहिले नाही, हे सध्या वापरात असणारे तंत्रज्ञान आहे. भाषा समजून घेण्याच्या क्षमतेमुळे बऱ्याच क्षेत्रात याचा वापर होवू शकतो. आभासी सहाय्यक ब्रँन्डस् व ग्राहक यांच्यातील संवाद घडवून आणण्यास समर्थ होत आहेत आणि याचा ग्राहक वर्गास भरपूर फायदा होताना दिसत आहे. चॅट बॉट वापरत असताना त्यामध्ये एखादी कारवाई करण्याची बुद्धिमत्ता असणे सोबत जुने व्यवहार, भावना विश्लेषण यांची उकल करता येणे हि खरी आजची गरज व वेळेची आवश्यकता आहे. हि चॅट बॉट पूर्ण करेल अस वाटत असल तरी खरच चॅट बॉट ग्राहकांसाठी तयार आहेत का? हा प्रश्न जाणकारांना पडत आहे, याच उत्तर येणारा काळच देवू शकेल हे नक्की !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?