फॉलोअर

बीट कॉईन्स काय आहे ?



बीट कॉईन्स, इंटरनेटवर  चर्चेत असलेल चलन, असं चलन जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि ते सोबत बाळगायचं देखील नाही कारण हे एक आभासी चलन आहे. थोडस आश्चर्य वाटल असेल, पण हे खर आहे. २००९ साली बीट कॉईन्स अस्तित्वात आले आणि २०१७ मध्ये त्यास प्रसिद्धीची झळाली मिळाली.  बीट कॉईन्स मध्ये कोणतीही बँक सहभाग नोंदवीत नाही, कोणताही एजंट या मध्ये सहभागी नसतो, तुम्ही थेट ज्यास पैसे देणे लागता त्यास ते ट्रान्सफर करू शकता यासाठी आभासी पाकीट तुम्हाला पुरविण्यात येते. हे आभासी चलन वापरण्यासाठी देशाची बंधने आडवी येत नाहीत, हे चलन देशाच्या सीमांनाही सहज ओलांडताना दिसून येत आहे. याचे पेमेंट करताना

कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येत नाहीत हि बाब विशेष आहे. काही मंडळी बीट कॉईन्स ची खरेदी गुंतवणूक म्हणून करताना आढळत आहेत, काय सांगावे भविष्यात त्याचा त्यांना योग्य परतावा मिळेल !!!
          बीट कॉईन्स एक्सचेंज च्या माध्यमातून लोक बीट कॉईन्स खरेदी करीत आहेत हि खरेदी करताना देशाचे चलन महत्वाचे रहात नाही हि बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे. नुकतेच भारतामध्ये बीट कॉईन्स ज्यांच्या कडे आहेत असा संशय असणाऱ्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. बीट कॉईन्स वापरासाठी वेगळे कायदे असणे गरजेचे आहे. कारण २०१७ मधील बीट कॉईन्स ची आकडेवारी थक्क करणारी आहे. आज दिवशी भारतीय चलनाप्रमाणे एक बीट कॉईन म्हणजे ११,३९,३८७.३४ रुपये एवढी मोठी रक्कम आहे. झालात ना थक्क !!!! वाटले ना आश्चर्य !!!
          बीट कॉईन्स डिजिटल कॅश ज्याप्रमाणे पाठविली जाते त्याचप्रमाणे पाठविता येतात. गणिती कोडी सोडवून बीट कॉईन्स मिळविता येतात, याचा वापर वाढत आहे. साधारण पणे एक गणिती कोडे जर यशस्वी पणे सोडविले तर १२.५ बीट कॉईन्स कमविता येतात आणि तेही सरासरी १० मिनिटामध्ये. बीट कॉईन्स या डिजिटल वॉलेट मध्ये ठेवता येवू शकतात. हे वॉलेट म्हणजे तुमचे बँक खाते जसे असते अगदी त्याप्रमाणे !! याचा वापर करून तुम्ही बीट कॉईन्स ची देवाण घेवाण करू शकता. पण बँकांना ज्याप्रमाणे रिझर्व बँकेचे संरक्षण, मापदंड असतात त्याप्रमाणे यास कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही, हे समजून घेणे नितांत आवश्यक आहे. बीट कॉईन्स ची मागणी करणारे काही व्हायरस देखील अस्तित्वात आहेत ज्यामध्ये रॅन्समवेअर चे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे.
          बीट कॉईन्स वापरताना, खरेदी करणारा व विकणारा या दोघांची ओळख गुप्त राहते, त्या दोघांचे फक्त वॉलेट आय डी ने दोघांची माहिती मिळू शकते त्यामुळे व्यवहारात खूपच गुप्तता आपोआप पाळली जाते आणि हाच मुद्दा लोकांना भावत असावा. बीट कॉईन्स च्या वापरावर कोणत्याच देशाची बंधने नाहीत त्यामुळे याच भविष्य काय असेल हे आज तरी वर्तविणे अवघड आहे पण जापान, चायना, ऑस्ट्रेलिया या देशांनी नियमांचे उपाययोजन सुरु केले आहे आणि सोबतच प्रत्येक ठिकाणच्या शासनास यावर टॅक्स कसा आकारावा यावर विचार मंथन सुरु झालेले आहे.
          आज तरी मोहात न पडता बीट कॉईन्स पासून लांब राहिलेले बर, असेच सुचवावे वाटते.         

 अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?