फॉलोअर

मेल मर्ज काय आहे ?



रेखा आणि सुरेखा दोघी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत आता सर्वंकष मूल्यमापन पद्धती आल्यामुळे शिक्षकांना संगणकाचा वापर करणे अनिवार्य होत चालल आहे. अर्थात शिक्षण संगणकाचा वापर देखील करत आहेत. रेखा व सुरेखा दोघी मैत्रिणी एकाच वेळी शाळेत रुजू झाल्या आणि आपली सेवा बजावू लागल्या. शाळेतील मुलांच्या सर्वात जास्त आवडत्या शिक्षिका बनल्या आहेत. यामध्ये त्यांचे शैक्षणिक योगदान मोलाचे आहेच पण दोघीही प्रात्यक्षिक केंद्रित प्रशिक्षण देण्यामध्ये विश्वास ठेवतात त्यामुळे सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. शाळेत पुढील महिन्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालक दोघांसाठी आहे.     
          नुकतीच मुख्याध्यापकानी सर्व शिक्षकांना माहिती दिली व कामास सुरुवात करा, जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक कार्यक्रमास कसे उपस्थित राहतील याकडे जातीने लक्ष द्या अशा सूचना केल्या. त्याचवेळी सुरेखा ने पुढे होत, आपण सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आमंत्रण पत्र पाठवावीत असे सुचविले. “पण एकाच वेळी एवढी पत्र लिहून आणि पोस्ट करून होतील?” , मुख्याध्यापकांनी सुरेखाला विचारल. यावर सुरेखा म्हणाली, “पत्र लिहायची नाहीत, संगणकाचा वापर करून तयार करायची आणि पोस्टाने पाठवायची.” ,मुख्याध्यापकांनी लागलीच हि जबाबदारी सुरेखावर सोपविली आणि सर्व शिक्षकांना सोबत घेवून काम फत्ते करण्यास सांगितले. रेखा सुरेखाला म्हणाली, “काय ग, कस करणार आहेस हे काम?” यावर सुरेखा म्हणाली, “अग मी उन्हाळी सुट्टी मध्ये संगणक कोर्स केला आहे त्यात आम्हाला या गोष्टी कशा करायच्या हे शिकविले आहे. म्हणजे एकाच वेळी पत्र अनेकांना कस पाठवायचं!! “मेल मर्ज वापरून हे करता येते.” बघ ना, विद्यार्थ्याच्या घरी पाठवायची पत्र , अर्थात मजकूर सारखाच असणार, बदलेल ते फक्त विद्यार्थ्याचे नाव व पत्ता , बाकी सार सारखच असेल. “वा सुरेखा, वा हुशार आहेस”, रेखा म्हणाली आणि दोघी हसल्या !!!
          पुढे दुसरे दिवशी सर्व शिक्षकांना सुरेखा मार्गदर्शन करताना म्हणाली, विद्यार्थ्यांना पाठवायची पत्र मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तयार करावीत आणि विद्यार्थ्याची नावे व पत्ते देखील तयार करून घ्यावीत. या दोन्ही बाबींना एकत्र केले कि झाल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने पत्र तयार होईल. सुरेखा पुढे म्हणाली, मेल मर्ज हि सुविधा अशा प्रकारची पत्रे पाठविण्यासाठी करता येते. जिथे पत्राचा मायना सारखाच असतो पण प्राप्तकर्त्याची नाव बदलतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मेल मर्ज नावाची सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्ही अशाप्रकारची पत्रे पाठवू शकता. तुम्हाला करायचं एवढच आहे , सुरुवातीस विद्यार्थ्यास पाठवायचे आमंत्रण पत्र तयार करा आणि त्यास सेव करा, सुरक्षित करा. नंतर मेलिंग या टॅब मध्ये जावून ज्या विद्यार्थ्यांना पाठवायची आहेत त्यांची यादी तयार करा. तयार झालेली नाव व पत्याची यादी तुम्ही तयार केलेल्या पत्रात समाविष्ट करा आणि मर्ज डॉक्युमेंट हा पर्याय निवडा तुम्हास दिसेल कि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे एक पत्र तयार झालेलं असेल.
          हि माहिती ऐकून सर्व शिक्षक आवाक् झाले त्यांनी सुरेखाचे आभार मानले आणि सर्व शिक्षकांनी देखिल याच पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना पत्र तयार केली आणि पाठविली देखील. ज्या कार्यक्रमासाठी पत्र पाठविली होती त्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मुख्याध्यापकांनी सुरेखाच अभिनंदन आणि कौतुक केले.

अमित कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?