क्रोम ओ.एस.- गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम
आपण कॉम्प्युटर वापरतो, स्मार्ट फोन वापरतो पण तो चालतो कसा याचा विचार कधी केला आहे? तो कॉम्प्युटर / स्मार्ट फोन ऑपरेटिंग सिस्टीम मुळे सुरु होतो व चालतो. ऑपरेटिंग सिस्टीम असते म्हणून आपण त्यावर विविध प्रोग्राम्स,अॅप्स वापरू शकतो, जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपणांस काहीच करता येत नाही, सर्वात महत्वाच म्हणजे सुलभ युजर इंटरफेस देण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टीम करते, ज्यामुळे युजरला कॉम्प्युटर / स्मार्ट फोन वापरणे सोईचे होते. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड या काही आपणांस माहिती असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. यांचा वापर तुम्ही कॉम्प्युटर व स्मार्ट फोन वर करीत असाल. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड चा सर्वात मोठा आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांचा ग्राफिकल युजर इंटरफेस, ज्यास GUI असे देखील म्हणतात. या दोन ऑपरेटिंग सिस्टीम व्यतिरिक्त लिनक्स हि एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात उपलब्ध आहे. हि ऑपरेटिंग सिस्टीम देखील GUI ची सुविधा उपलब्ध करून देते. गुगल या टेक्नोलॉजी कंपनीने जुलै २००९ मध्ये सर्व प्रथम ऑपरेटिंग सिस्टीम देण्याबाबत जाहीर प्रसिद्धी केली होती परंतु सर्व तयारी पूर्ण