Industrial Internet Of Things (IIOT)
आय.आय.ओ.टी (IIOT) म्हणजे काय ?
IIOT म्हणजे इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ
थिंग्ज. आय ओ टी मध्ये संगणक, इतर साधने/ वस्तू या एकमेकाशी इंटरनेट द्वारे
जोडलेल्या असतील व त्या एकमेकांमध्ये देटा शेयर करतील हे क्लाऊड तंत्रज्ञानाने
साध्य करता येवू शकेल, अस म्हणण्यापेक्षा शेयर होते आहे अस म्हणणे योग्य होईल कारण
तसा वापर वाढत चालला आहे. (महानगरा मध्ये वापर होत आहे.) हळूहळू आय ओ टी ची
व्याप्ती घरामध्ये, शाळामध्ये, दुकानांमध्ये अनुभवता येवू शकेल, डेटा शेयरिंग करीत
उत्पादन क्षमता वाढविणे हेतू आय आय ओ टी ची संकल्पना वापरात आणली असता पूर्वी
पेक्षा उत्पादन क्षमता वाढू शकते असे तज्ञांचे मत आहे. काही नाविण्य जपणाऱ्या
कंपन्यांनी त्यांच्याकडील साधनांना एकमेकाशी जोडून यावर काम देखील सुरु केले आहे.
आय आय ओ टी (IIOT) च्या सहाय्याने
कंपन्या त्यांच्याकडील साधनं एकमेकाशी जोडून तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत
त्यामुळे साधनांची सूचक देखभाल करणे या कंपन्यांना सहज शक्य होते आहे. IIOT मुळे
कंपन्यांना फॅक्टरी फ्लोअर ते कार्यालय पर्यंत उपलब्ध विविध साधनांना एकमेकाशी
जोडणे शक्य होत आहे. उत्पादन क्षमता वाढविणे तसेच या कार्यप्रणाली आधारे नवीन
निर्णय घेणे या प्रक्रिया या सर्वामुळे शक्य होवू शकेल असा तज्ञांचा अंदाज आहे.
२०१७ हे वर्ष इंडस्ट्रीज च्या तांत्रिक
बदलाचे वर्ष या रुपात पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये कारण इंडस्ट्रीज याचा
विचार करीत आहेत , वापर देखील करायला सुरुवात करीत आहेत. २०१६ च्या जागतिक आय ओ टी
(IOT) सर्व्हेनुसार ४०% संस्थानी आय ओ टी ची सुरुवात केली आहे व ५७% वेगवेगळ्या
ठिकाणी याची सुरुवात करायच्या तयारीत आहेत. या सगळ्यासोबत ७३% कंपन्या अशा आहेत
ज्या त्यांच्या खर्चाच्या बजेटमध्ये 20% पेक्षा जास्त “बिग डेटा” या संकल्पनेवर
खर्ची घालणार आहेत, हा आय आय ओ टी साठी महत्वाचा टप्पा मानला जातोय कारण यावरच
कंपनीचे सायंटीफिक मॉडेल उभे राहणार !!
IIOT मध्ये सूचक देखभाल व दूरस्थ
व्यवस्थापन हि दोन नवीन क्षेत्र कुशल तंत्रज्ञाना साठी उघडणार आहेत. माहिती
तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान हा IIOT साठी पाया समजला जावू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी
देखील या तंत्रज्ञानाकडे तेवढ्याच कुतुहलाने पाहणे आवश्यक आहे असे सुचवावे वाटते.
आज आय. ओ. टी व आय.आय.ओ.टी मुळे दिशा स्पष्ट आहे आता आपण ठरवावे कि हे तंत्रज्ञान
आपण किती लवकर आत्मसात करावे.
अमित
कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा