ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

ऑनलाईन जाहिरातीचे विश्व



जाहिरात आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे, यात शंका कोणाच्याही मनात नसावी, माझ्यातर अजिबात नाहीच !! वृत्तपत्रापासून, टीव्ही अगदी अवती भवती सुद्धा जाहिरातींचा मारा आपल्यावर अखंड सुरु असतो. वेब साईट तयार करताना देखील आजकाल जाहिराती याठिकाणी पोस्ट केल्या जातात. तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वर जेंव्हा एखादे अॅप इंस्टॉल करता त्यावेळी देखील तुम्हाला जाहिराती पहावयास मिळतात, मग आता प्रश्न पडला असेल कि मी आज जाहिराती बद्दल एवढ का तुम्हाला सांगतोय ? तर त्याच कारण हि तसेच आहे तुम्ही देखील तुमच्या व्यवसायाच्या जाहिराती विविध वेब साईटवर पोस्ट करू शकता आणि ते देखील योग्य भावा मध्ये !!
          ऑनलाईन जाहिरात करणे हेतू तुम्ही गुगल अॅडवर्ड, बिंग, अॅङरोल, 7सर्च, अॅडलॅडमार्क ई. नेटवर्कचा वापर करू शकता. गुगल अॅडवर्ड मध्ये जाहिरात करायची असल्यास ती गुगल सर्च इंजिनला उघडल्यास सेक्शन 1 व सेक्शन 2 या स्वरूपात दोन ठिकाणी आपणांस दिसेल. इथे युजर ने सर्च केलेल्या कि-वर्ड प्रमाणे डेटा सर्च होतो व रिझल्ट दाखविताना गुगल तुमच्या जाहिरातीची लिंक सेक्शन 1 / सेक्शन 2 मध्ये युजरला दाखवितो.
गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने त्या अनुषंगाने जाहिरात जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोह्चू शकते. गुगल चे स्वत:चे डिस्प्ले नेटवर्क आहे ज्यामध्ये गुगुल फायनान्स,जी-मेल, ब्लॉगर, यु-ट्यूब आदींवर तुम्हाला तुमची जाहिरात करता येवू शकते. या ऑनलाईन जाहिरातीमुळे युवकांना नवीन क्षेत्रात संधी खुप आहेत कारण जाहिरात कशी आकर्षक करता येईल यामध्ये शब्दांना खुप महत्व असतं आणि ते जाहिरात लेखनामध्ये आपणांस पहावयास मिळते. जर आपण गुगल अॅडवर्ड अथवा इतर कोणत्याही प्रोव्हायडरच्या सहाय्याने जाहिरात केली तर युजरला खालील बाबींची काळजी घेणे योग्य ठरते.
1.    इतर कोणी तुमचे अकौंट वापरत आहे का किंवा त्यात कोणी काही बदल केले आहेत काय ? याकडे लक्ष ठेवणे.
2.    संगणकास जाणीवपूर्वक नुकसान करणे हेतू तयार करण्यात आलेले मालवेअर्स पासून बचाव करणे त्यासाठी अॅन्टीव्हायरस चा वापर करणे.
3.    पासवर्ड चा व्यवस्थित वापर व वारंवार बदल करणे सवय लावून घेणे.
4.    स्टेप 2 व्हेरिफिकेशन वापर करावा- यामध्ये तुमच्या फोनवर सेक्युरिटी कोड पाठविला जातो मग पुढील कार्यवाही करता येते.
ऑनलाईन जाहिरातच्या सफरीसाठी तुम्हाला शुभेच्छा !!
अमित कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?