फॉलोअर

क्रोम ओ.एस.- गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम



आपण कॉम्प्युटर वापरतो, स्मार्ट फोन वापरतो पण तो चालतो कसा याचा विचार कधी केला आहे? तो कॉम्प्युटर / स्मार्ट फोन ऑपरेटिंग सिस्टीम मुळे सुरु होतो व चालतो. ऑपरेटिंग सिस्टीम असते म्हणून आपण त्यावर विविध प्रोग्राम्स,अॅप्स वापरू शकतो, जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपणांस काहीच करता येत नाही, सर्वात महत्वाच म्हणजे सुलभ युजर इंटरफेस देण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टीम करते, ज्यामुळे युजरला कॉम्प्युटर / स्मार्ट फोन वापरणे सोईचे होते. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड या काही आपणांस माहिती असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. यांचा वापर तुम्ही कॉम्प्युटर व स्मार्ट फोन वर करीत असाल. मायक्रोसॉफ्ट विंडोज, अॅन्ड्रॉईड चा सर्वात मोठा आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांचा ग्राफिकल युजर इंटरफेस, ज्यास GUI असे देखील म्हणतात. या दोन ऑपरेटिंग सिस्टीम व्यतिरिक्त लिनक्स हि एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात उपलब्ध आहे. हि ऑपरेटिंग सिस्टीम देखील GUI ची सुविधा उपलब्ध करून देते.
          गुगल या टेक्नोलॉजी कंपनीने जुलै २००९ मध्ये सर्व प्रथम ऑपरेटिंग सिस्टीम देण्याबाबत जाहीर प्रसिद्धी केली होती परंतु सर्व तयारी पूर्ण करीत (अजूनही त्यात बदल सुरूच आहेत.)१५ जून २०११ रोजी गुगल ने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि त्यास क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम असे नाव दिले. हि ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स वर आधारित असून गुगल क्रोम ब्राऊजरचा मुख्य इंटरफेस म्हणून वापर करण्यात आला आहे. हि ऑपरेटिंग सिस्टीम मुख्यत्वे करून वेब बेस्ड अॅप्लीकेश्न्स वापरण्याकरिता तयार करण्यात आलेली आहे.
गुगल

          सर्वात प्रथम ज्या लॅपटॉपवर हि ऑपरेटिंग सिस्टीम वापरली गेली त्या लॅपटॉपला क्रोम बुक असे नांव देण्यात आले, या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मेडिया प्लेअर, फाईल मेनेजर देण्यात आलेले आहेत. याचा वापर करून गाणी ऐकणे, फाईल स्टोरेज व्यवस्थित करणे हेतू वापर होवू शकतो. २०१४ पासून या मध्ये काही अॅन्ड्रॉईड अॅप्लीकेश्न्स देखील वापरता येत आहेत. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम हि आत बाल्यावस्थेत आहे असे म्हणाल्यास वावगे होणार नाही पण या ऑपरेटिंग सिस्टीमला भविष्य आहे. कारण प्रत्येक युजर हक गुगल शी या ना त्या प्रकारे जोडला गेला आहे , क्रोम ब्राऊजर देखील वापरतो. W3SCHOOLS च्या सर्व्हे नुसार त्यांच्या  वेबसाईट ला भेट देणारे ७५% युजर हे क्रोम ब्राऊजर चा वापर करतात तर जागतिक आकडेवारी नुसार ५७% युजर क्रोम ब्राऊजर चा वापर करतात, तुम्ही कोणता ब्राऊजर वापरता ?

          नव्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम चे स्वागत करुया !!
 
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?