पासवर्ड कसा असावा ?
दीक्षा इयत्ता ११ वी मध्ये शिकत आहे, सोबतच तिने संगणक शिक्षण घेतलेले आहे. तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत त्यांनी नुकताच इंटरनेट बँकिंग साठी बँकेत अर्ज दाखल केला आहे. या अर्जाच्या आधारे त्यांच्या बँकेच्या खात्यास लवकरच नेट बँकिंग सेवा सुरु होईल असा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांना दिला आणि नेट बँकिंग सेवा सुरु देखील झाली. बँकेने दीक्षाच्या वडिलाना पासवर्ड सेट करण्याबद्दल मार्गदर्शन केले त्यानुसार त्यांनी पासवर्ड सेट देखील केला आणि तो लक्षात राहावा या हेतूने त्यांच्या खिशातील डायरी काढली व त्यात पासवर्ड लिहू लागले, इतक्यात दीक्षा त्यांना म्हणाली “बाबा, हा पासवर्ड डायरीत लिहू नका, तो लक्षात ठेवा, कारण जर डायरी हरविली तर पासवर्ड देखील हरवेल आणि त्याचा गैर वापर होवू शकेल !”, दीक्षाच्या या वक्तव्यामुळे तिच्या वडिलांना तिचे खुप कौतुक वाटले आणि ते म्हणाले, “या आजच्या आय टी च्या युगात आता तुमच्या पिढीकडून बरच काही शिकण्यासारखे आहे आणि ते आम्ही शिकले पाहिजे !!” दीक्षा पुढे म्हणाली बाबा, पासवर्ड चे महत्व आज तुम्हाला सांगते, पासवर्ड कसा असावा यावर खालील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे