फॉलोअर

झिप-अनझिप म्हणजे काय ?



“सेजल, मला माझी फाईल पेन ड्राईव्ह वर सेव्ह करायची आहे, पण पेन ड्राईव्ह मध्ये पुरेशी जागा नाही असा मेसेज येतो आहे, काय करू एक तर प्रेझेन्टेशन चे टेन्शन आणि त्यात हे अजून एक टेन्शन,प्लीज मला मदत करशील?”, अमृता सेजल शी फोनवर बोलत होती. सेजल आणि अमृता एकाच वर्गात शिकत आहेत. सेजल ने विविध संगणक कोर्सेस केलेले असल्याने तिला या विषयी माहिती होती. अमृताने विद्यापीठस्तरिय प्रेझेन्टेशन स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्यामुळे तिला तिचे प्रेझेन्टेशन सादर करण्यासाठी पेन ड्राईव्ह वर स्टोअर करायचे आहे पण पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने फाईल स्टोअर करणे तिला जमत नव्हते, सेजल लागलीच तिच्या घरी पोहोचली आणि तिने अमृताला अशावेळी फाईल कशी कॉम्प्रेस करून सेव्ह करायची हे शिकविले.  

          फाईल कॉम्प्रेशन अर्थात फाईल चा साईज कमी करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रोग्राम. विंडोज ७ मध्ये हा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. तुम्हाला कॉम्प्रेस करायच्या फाईल ला निवडावे लागेल व त्यास कॉम्प्रेस्ड झिप फॉरमेट मध्ये बदलता येईल. फाईल कॉम्प्रेस करण्यासाठी विनझिप, विनरार, सेव्हन झिप ई.प्रोग्राम्स

उपलब्ध आहेत. आपण ई-मेल पाठविताना देखील एखाद्या फाईल चा साईज कमी करण्यासाठी अशा प्रोग्रामचा वापर करू शकतो. हे प्रोग्राम्स तुमच्या फाईलच्या साईजना कमी करण्यात मदत करतात जेणे करून मेल करताना अडचणी निर्माण होत नाहीत. एकावेळी मेलच्या सहाय्याने २५ एम.बी. एवढा डेटा पाठविता येतो पण आपल्याकडील डेटा कॉम्प्रेस केल्यास तो पाठविणे सोईचे होवू शकते.
          फक्त मेल अथवा पेन ड्राईव्ह मध्ये डेटा स्टोअर करतानाच हा पर्याय वापरावा असे नाही तर आपल्याकडील संगणकावरील फाईल्स देखील कॉम्प्रेस करून ठेवता येवू शकतात ज्यामुळे डिस्क स्पेस मिळू शकते व संगणकाच्या प्रोसेसिंग मध्ये देखील फरक जाणवू शकतो. सेजल ने अमृताच्या प्रेझेन्टेशन फाईलला कॉम्प्रेस करून पेन ड्राईव्हवर स्टोअर करून दिले. अमृतास सेजल ने केलेल्या मदतीने तिचे काम तर झालेच पण फाईल कॉम्प्रेशन चे महत्व देखील पटले आणि यासाठी तिने सेजल चे आभार मानले.


अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?