पासवर्ड कसा असावा ?
दीक्षा
इयत्ता ११ वी मध्ये शिकत आहे, सोबतच तिने संगणक शिक्षण घेतलेले आहे. तिचे वडील एका
खासगी कंपनीत नोकरीस आहेत त्यांनी नुकताच इंटरनेट बँकिंग साठी बँकेत अर्ज दाखल
केला आहे. या अर्जाच्या आधारे त्यांच्या बँकेच्या खात्यास लवकरच नेट बँकिंग सेवा
सुरु होईल असा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांना दिला आणि नेट बँकिंग सेवा सुरु
देखील झाली. बँकेने दीक्षाच्या वडिलाना पासवर्ड सेट करण्याबद्दल मार्गदर्शन केले
त्यानुसार त्यांनी पासवर्ड सेट देखील केला आणि तो लक्षात राहावा या हेतूने
त्यांच्या खिशातील डायरी काढली व त्यात पासवर्ड लिहू लागले, इतक्यात दीक्षा
त्यांना म्हणाली “बाबा, हा पासवर्ड डायरीत लिहू नका, तो लक्षात ठेवा, कारण जर
डायरी हरविली तर पासवर्ड देखील हरवेल आणि त्याचा गैर वापर होवू शकेल !”,
दीक्षाच्या या वक्तव्यामुळे तिच्या वडिलांना तिचे खुप कौतुक वाटले आणि ते म्हणाले,
“या आजच्या आय टी च्या युगात आता तुमच्या पिढीकडून बरच काही शिकण्यासारखे आहे आणि
ते आम्ही शिकले पाहिजे !!” दीक्षा पुढे म्हणाली बाबा, पासवर्ड चे महत्व आज
तुम्हाला सांगते, पासवर्ड कसा असावा यावर खालील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे.
१.
पासवर्ड हा मोठा असावा, तो सहज लक्षात ठेवण्यासारखा नसावा.
२.
पासवर्ड कमीत कमी सहा ते दहा अक्षरी असावा त्यात स्पेशल चिन्हांचा वापर करावा,
जसे कॅपिटल अक्षरे व लहान अक्षरे यांचा एकत्रित वापर, पर्सेंट चिन्ह, अॅट
चिन्हांचा वापर आदी. ज्यामुळे तो सहजरीत्या ओळखता येणार नाही.
३. एकच पासवर्ड सगळ्या ठिकाणी वापरू नये. पासवर्ड एकमेकांना
सांगणे टाळावे.
४.
पासवर्ड लिहून ठेवायचाच असेल तर तो जिथे सुरक्षित राहू शकेल अशाच ठिकाणी लिहून
ठेवावा, अन्यथा लिहून ठेवणे टाळावे.
५.
पासवर्ड मध्ये वैयक्तिक माहिती असू नये. जसे कि वडिलांचे , आई चे नाव ई.
६.
ठराविक काळा नंतर पासवर्ड बदलत राहणे उचित
७.
फक्त नंबर, मग तो वाढदिवस तारीख, लग्नाचा वाढदिवस तारीख ई.पासवर्ड मध्ये वापरू
नये.
८.
“पासवर्ड” हा शब्दच पासवर्ड म्हणून वापरू नये.
९.
युजरनेम चा वापर देखील पासवर्ड मध्ये करणे टाळावे.
१०. डिक्शनरी मधील शब्दांचा वापर करणे टाळावे.
हे महत्वाचे मुद्दे ऐकल्यावर दीक्षाचे बाबा दीक्षाला
म्हणाले, “थॅंक्स दीक्षा !! मी हे सर्व मुद्दे ध्यानात ठेवेन आणि त्यानुसारच माझा
पासवर्ड तयार करेन.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा