ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

Whatsapp स्वभाव !!



          शीर्षक वाचून थोड आश्चर्य वाटल असेल, हो ना? पण हे खर आहे, ह्या एका नव्या स्वभावाच वरदान मनुष्याला तंत्रज्ञानाने दिले आहे. आपण रोज विविध व्यक्तीना भेटतो त्यांचे स्वभाव पाहतो अनुभवतो आणि आपसूकच पु.लं. ची आठवण होते, त्यांच्या “व्यक्ती आणि वल्ली” ची ! मनुष्य प्राणी हा असाच आहे कधी एखाद्याला एकमेकाशी बोलायला कसलीच ओळख लागत नाही तर कधी एखाद्याला ओळख असतानाही बोलणे जमत नाही. ओळख नसतानाही बोलणारे आणि आपलस करून घेणारे लोक खरच स्वत:च एक अस्तित्व तयार करतात. स्वत:ची एक स्पेस तयार करतात, तुम्हालाही असा अनुभव आला असेलच कि !! पण आता जमाना whatsapp आणि फेसबुक चा आलाय मग त्यात विविध समूह (ग्रुप) आले, समुहातील गप्पा आल्या ! महत्वाच म्हणजे माणस आली....
          माझ निरीक्षण अस सांगत कि समूह तयार करणारा एक प्रमुख व्यक्ती असतो कि जो त्याच्या सम्पर्कातील विविध मंडळीना एका समुहात बांधण्याच काम करतो. कधी समूह एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून तयार केलेले असतात काहीवेळा सहजच केलेले असतात. प्रत्येक समूह सदस्याची एकमेकांची ओळख असतेच अस नाही आणि इथेच मनुष्य स्वभाव दिसून यायला लागतो, समुहातील सदस्य एकमेकांचा परिचय करून देतातच अस नाही, खर तर परिचय करून द्यायला हवा पण अस सहसा होत नाही. पुढाकार कोणी घ्यायचा आणि सर्वात महत्वाच म्हणजे “का” घ्यायचा, याच उत्तर कुठेच सापडत नाही आणि कुणी सांगत (स्वत:हून) हि नाही. ते ज्याच त्याला शोधाव , उमगाव लागत. वास्तविक या समूहाच्या माध्यमातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, मदत मिळू शकते पण फक्त सुप्रभात आणि शुभरात्री या सारख्या संदेशांवर धन्यता मानली जाते......

          या सोशल मेडिया टूल्स चा वापर एखाद्याच भावविश्व उलगडण्यासाठी, ज्ञान देणे/घेणे, नातेसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि आणखी बऱ्याच बाबींसाठी होवू शकतो, पण असे होताना दिसत नाही. किंबहुना तसे करणे आपल्या “शान” च्या विरोधात आहे असा काहींचा समज असतो. एखाद्या समुहात एखादी ज्ञानवर्धक पोस्ट आली अथवा माहिती वजा लेख आला तर फक्त ओळखीचे सदस्य (पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीस ओळखणारे) उत्तर (रीप्लाई) देतात, बाकीचे “शांतीला” धरून बसतात. कशाला उत्तर द्या? कोण आहेत हे पोस्ट करणारे? कोण वाचणार हे? उत्तर देणे थोडेच बंधनकारक आहे? बर नाही देत आम्ही उत्तर, आम्ही फक्त वाचतो !! आम्हाला कळत नाही, सुचत नाही काय उत्तर द्यावे , अशी एक ना अनेक स्वभावी मंडळी समुहात असतात, पण आपल्या समुहातील एखादी व्यक्ती “व्यक्त” होते आहे तर आपणहि त्यास प्रोत्साहित करणे हेतू, ओळख होणे व वाढविणे हेतू उत्तर द्यायला हवे, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी माणूस जन्म एकदाच ! अस म्हणतात मग आपला स्नेह भाव वृद्धिंगत केला तर त्यात काही अडचण असावी, असे वाटत नाही !! ह्याच स्नेह भावातून पुढे जावून मित्रत्वाच नात निर्माण होते आणि तेच आयुष्यभर सोबत करते, मनुष्यप्राण्याला आयुष्य आनंदात जगायला या पेक्षा दुसरे काही कशाला हवे ?
           
पहा विचार करा !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

तळटीप: तुम्हीही अनुभव घेतला असेल, तुमचा अनुभव कमेंट करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?