फॉलोअर

व्यावसायिक आमंत्रण पत्र - कौशल्य - स्किल सेट २



          “किरण, आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र दोन दिवसात तयार कर आणि मला दाखव.” किरण च्या साहेबांनी किरण ला फर्मावले. साहेबांच्या या नव्या फर्मावलेल्या ऑर्डर ने किरण पुरता गोंधळून गेला, किरणला लक्षात येईना कि कोणता प्रोग्राम / सॉफ्टवेअर वापराव आणि साहेबांना खुश कराव. याच विचारात तो संगणकावर कंपनी चे रोजचे काम करू लागला. किरण च तोडक ज्ञान आत मात्र त्याला आडव येत होत. त्याने कधीच ऑफिस कामा व्यतिरिक्त संगणक वापरला नव्हता त्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली होती. तेवढ्यात त्याचा मित्र राहुल त्याच्या जवळ आला व त्याला म्हणाला, “किरण, काय करतो आहेस? काही अडचण ? , यावर किरण ने काही नाही अशी नकारार्थी मान हलवली आणि परत काम करू लागला. राहुल ला कळून चुकले कि काही तरी गडबड आहे तो परत म्हणाला चेहरा का असा झालाय ?, मी काही मदत करू का? यावर किरण म्हणाला, “नेकी और पुछ पुछ.” दोघे हि हसले पुढे किरण म्हणाला, “अरे राहुल, आज साहेबांनी वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र तयार करायला सांगितले आहे, मला !! कस तयार करावे काहीच कळेना, “मी एवढा संगणक कधी वापरला नाही रे !!. यावर राहुल म्हणाला , “अरे मित्रा, एकदम सोप आहे, चल मी तुला मदत करतो.”

          राहुल ने संगणक ज्ञान वाढविणे हेतू नुकताच संगणक कोर्स पूर्ण केला आहे त्यामुळे राहुल ला त्या बद्दल माहिती आहे. राहुल किरणला म्हणाला, “तुला आमंत्रण पत्र मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड मध्ये तयार करता येईल. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वर्ड तुला हि सेवा उपलब्ध करून देत, तू काही मोजक्याच स्टेप्स पूर्ण करायच्या आणि तुझ आमंत्रण पत्र तयार !! एवढ सोप आहे !! 


किरण म्हणाला. राहुल पुढे बोलू लागला, मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ आवृत्ती पासून पुढील प्रत्येक आवृत्ती मध्ये हि सुविधा खूप चांगल्या प्रकारे देण्यात आली आहे. या सुविधे चा वापर करून व्यावसायिक, वैयक्तिक आमंत्रण पत्र तयार करता येतात. वर्ड मध्ये नवीन फाईल्स तयार करताना “न्यू” नावाचा पर्याय आपण सारेच वापरतो, या पर्यायाचा वापर करायचा आणि उपलब्ध टेम्पलेटचा वापर करून आमंत्रण पत्र तयार करायचे. जर उपलब्ध टेम्पलेट मधील डिझाईन पसंत पडले नाहीत तर इंटरनेट च्या सहाय्याने नवीन टेम्पलेट्स डाऊनलोड करता येतात. टेम्पलेट्स या रेडी टू युज डॉक्युमेंट्स असतात. आपल्याला हवा तसा मजकूर त्यामध्ये बदल करायचा आणि फाईल सेव्ह करायची, झाल आमंत्रण पत्र तयार !!!

          दुसरेच दिवशी, किरण त्याच्या साहेबांकडे गेला आणि त्याने तयार केलेले आमंत्रण पत्र साहेबाना दाखविले. साहेब म्हणाले, “किरण, तू आमंत्रण पत्र एवढ्या लवकर तयार करशील अस वाटल नव्हत !! गुड जॉब !! साहेबांनी कौतुकाची थाप किरण च्या पाठीवर दिली आणि म्हणाले “कीप इट अप”. किरण साहेबांच्या केबिन मधून बाहेर आला आणि थेट राहुल च्या डेस्क कडे गेला आणि राहुलला म्हणाला  “थँक्स यार !, साहेबांना आमंत्रण पत्र जाम आवडल आणि साहेबांनी माझ कौतुक देखील केले.हे सगळ तू मदत केल्यामुळे शक्य झाल.” त्याच दिवशी किरण ला कळाल कि या २१ व्या शतकात संगणक शिक्षणापासून फारकत घेणे उचीत होणार नाही.

         

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?