पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

चॅट बॉट – मनोरंजक पण तितकच उपयोगी

इमेज
चॅट बॉट एक नव कोर तंत्रज्ञान जे तुम्हाला इंटरनेट च्या सहाय्याने संवाद साधण्यासाठी तयार केलेले आहे. हा संगणक प्रोग्राम आहे. एका सर्व्हे द्वारे अस समोर आल आहे कि इंटरनेट युजर्स हे सोशल मेडिया साईटस् पेक्षा मेसेंजर चा वापर जास्त करतात. अगदी हाच धागा पकडून चॅट  बॉट  ची निर्मिती केली जात आहे. काही नियम व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून चॅट  बॉट  ची निर्मिती होत आहे. हि सेवा कोणत्याही सेवेशी जोडता येवू शकते जसे कि काही ठराविक टास्क पासून गमतीसाठी चॅट  बॉट  वापरता येवू शकतो. चॅट बॉट हे तंत्रज्ञान आता इंटरनेट वरील जवळपास सर्वच ठिकाणी वापरलं जातं.  युजर्स सध्या विविध खरेदी ऑनलाईन करीत आहेत हि खरेदी करताना शक्यतो खरेदी करायची बाब ऑनलाईन सर्च केली जाते, त्या वेबसाईटवर ब्राउज केली जाते. साधारण पणे ती गोष्ट सापडत नाही तोपर्यंत ती सर्च केली जाते, इथेच चॅट  बॉट  चा वापर करता येतो, एखाद्या ऑनलाईन स्टोअर ने जर चॅट  बॉट  तयार केली तर दुकानामध्ये ज्याप्रकारे सेल्समन सोबत बोलणे होते अगदी त्याचप्रमाणे चॅट  बॉट  वर संवाद होवू शकतो यामुळे खरेदी करण अधिक सोप होवू शकत. चॅट  बॉट  ची काही उदाहरणे पाहूय

बीट कॉईन्स काय आहे ?

इमेज
बीट कॉईन्स, इंटरनेटवर  चर्चेत असलेल चलन, असं चलन जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि ते सोबत बाळगायचं देखील नाही कारण हे एक आभासी चलन आहे. थोडस आश्चर्य वाटल असेल, पण हे खर आहे. २००९ साली बीट कॉईन्स अस्तित्वात आले आणि २०१७ मध्ये त्यास प्रसिद्धीची झळाली मिळाली.   बीट कॉईन्स मध्ये कोणतीही बँक सहभाग नोंदवीत नाही, कोणताही एजंट या मध्ये सहभागी नसतो, तुम्ही थेट ज्यास पैसे देणे लागता त्यास ते ट्रान्सफर करू शकता यासाठी आभासी पाकीट तुम्हाला पुरविण्यात येते. हे आभासी चलन वापरण्यासाठी देशाची बंधने आडवी येत नाहीत, हे चलन देशाच्या सीमांनाही सहज ओलांडताना दिसून येत आहे. याचे पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येत नाहीत हि बाब विशेष आहे. काही मंडळी बीट कॉईन्स ची खरेदी गुंतवणूक म्हणून करताना आढळत आहेत, काय सांगावे भविष्यात त्याचा त्यांना योग्य परतावा मिळेल !!!           बीट कॉईन्स एक्सचेंज च्या माध्यमातून लोक बीट कॉईन्स खरेदी करीत आहेत हि खरेदी करताना देशाचे चलन महत्वाचे रहात नाही हि बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे. नुकतेच भारतामध्ये बीट कॉईन्स ज्यांच्या कडे आहेत असा संशय असणाऱ्यावर आ