सुजाण पालकत्व : II
शुभम श्रीकांत घाणेकर, एक गोंडस मुलगा, अभ्यासात हुशार, विविध खेळात निपुण. शुभमच्या घरी आई वडील आणि लहान बहीण, शुभम लहानपणा पासून लाडात वाढलेला, शुभम चे वडील सरकारी नोकरीस होते आणि आई गृहिणी, शुभम साधारण चवथी मध्ये असेल, घरा शेजारी मित्र मंडळी कांही त्याच्या वयाची, काही त्याच्या पेक्षा वयाने मोठी, पण सगळी संध्याकाळी शाळेतून आली की धमाल मस्ती करायचे. शुभमची जी मित्र मंडळी वयाने मोठी होती त्यांच्या कडे खिशात कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे असतं, एके दिवशी गिरीश, शुभम चा मित्र त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, “शुभम, माझ्याकडे बघ किती पैसे आहेत?” , याचं शुभम ला खूप अप्रूप वाटलं, गिरीश कडे पैसे आहेत आणि आपल्याकडे नाहीत यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला, काय करावे त्यास कळेना, थोडा वेळाने स्वत:ची समजून घालून शुभम खेळण्यात गुंग झाला. त्या दिवशी रात्री झोपताना शुभम ला सारखा गिरीश डोळ्या समोर येत होता त्यास झोप काही येईना, पण त्यादिवशी कसा बसा शुभम झोपला. दुसरे दिवशी सगळ्या मित्रांचे दुपारीच भेटायचे ठरले होते त्याप्रमाणे सगळे मित्र गोळा झाले आणि खेळ सुरु झाला. त्यादिवशी शनिवार होता, शुभमच्य