श्रवणीय उदित
उदित नारायण झा, आपण ज्यांना गायक उदित म्हणून ओळखतो, अनेक चित्रपटातील नायकांचे पडद्यावरील आवाज, उदित यांच्या आवाजात एक जादू आहे जी आजही त्यांच्याकडे आकर्षित करते,गाण कोणतही असो आवाज उदित यांचा असेल तर ते गाण आपसूकच ओठांवर कधी रुळतं आपल्यालाही कळत नाही. उदित यांचा जन्म १९५५ साली बिहार मधील बासी (एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे) या गावात झाला. १९७० मध्ये त्यांनी मैथिली,नेपाळी आणि भोजपुरी भाषेत गायन केले आणि ७० च्या अखेरीस जेंव्हा उदित मुंबई येथे आले तेंव्हा त्यांनी भारतीय विद्या भवन येथे सहा वर्ष शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले.बॉलीवूड मधील अनेक गायकांचे श्रद्धा स्थान, गुरुस्थानी असणारे श्री.मो.रफी हे यांचे गुरु, त्यांच्याकडे पाहूनच गायनाचे धडे गिरविणारे उदित, यांनी उमेदीच्या काळात नेपाळ रेडीओ वर देखील आपले योगदान दिले त्या नंतर १९८० साली मो.रफी यांच्या सोबत बॉलीवूड मधील त्यांचे पहिले गाणे गायले, हि संधी त्यांना संगीतकार राजेश रोशन यांनी “उन्नीस बीस” या चित्रपटासाठी दिली. याच दरम्यान किशोर दां सोबत देखील उदित यांनी गाणे गायले पण हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण होता, एखाद्या स्ट्रगल