ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

ई.व्ही.एम.- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन


ई.व्ही.एम. अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन भारतात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (हैदराबाद) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बंगळूरू) ने तयार केलेली हि मशीन जिच्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. अशी मशीन साधारण १९९० साली तयार करण्यात आली आणि नंतर १९९८ ते २००१ दरम्यान  टप्प्या टप्प्याने आणि २००४ लोकसभा आणि सर्व साधारण निवडणुकामध्ये वापरण्यात आली. या मशीन ची विविध स्तरावर चाचणी घेवूनच याचा वापर सुरु करण्यात आला हे महत्वाचे ! हे मशीन वापरात येण्या अगोदर बॅलेट पेपर वापरला जायचा हे आपण जाणताच, बॅलेट पेपरच्या वापर (ज्यामध्ये फसवे मतदान, बूथ कॅप्चरिंग करणे सहज शक्य होते) करण्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर या मशीन्स चा वापर सुरु करण्याचा विचार निवडणूक आयोगाने घेतला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. बूथ कॅप्चरिंग करून मतदान करणे या बाबी कशा व्हायच्या याचा अभ्यास करणे अथवा त्यावर विचार व्यक्त करणे आवश्यक नाही, पण हे व्हायचे म्हणून आयोगाने हा निर्णय घेतला. एक मत देण्यास लागणारा वेळ ई.व्ही.एम. ने ठराविक केला त्यामुळे एका मिनिटात फक्त पाच मते रेकॉर्ड केली जातात. या बाबी मुळे मतदान प्रक्रियेमध्ये सर्व ठिकाणी समानता आली अस म्हणायला हरकत नाही. या ई.व्ही.एम. च्या सहाय्याने जे मतदान केले जाते यामध्ये यंत्रास फक्त एकदाच लिहिण्याची परवानगी देण्यात आलेली असते आणि नंतर तो लिहिलेला डेटा (केलेले मतदान) फक्त वाचता येतो त्यात बदल करता येत नाही (हे खूप महत्त्वाचे). ज्यास संगणकीय भाषेत राईट वन्स- रीड ओनली मेमरी असं म्हणतात.   

          ई.व्ही.एम. मध्ये दोन प्रकारचे युनिट्स असतात, १. कंट्रोल युनिट २. बॅलेटिंग युनिट, हे दोन्ही युनिट एकमेकास पूरक आहेत. दोन्ही एकत्रित आल्या शिवाय कामकाजच होवू शकत नाही. मतदार मतदान करण्यास मतदान कक्षात गेल्यावर बॅलेट युनिट त्यास मतदान करण्यास उपलब्ध होते मतदान केल्यावर अधिकारी कंट्रोल युनिट च्या सहाय्याने “क्लोज” अशी कमांड देतो ज्यामुळे मतदाराच्या मताची नोंद होते आणि युनिट लॉक होते ज्यामुळे एकच मतदार पुन्हा मतदान करू शकत नाही.      ई.व्ही.एम. चे उत्पादन करताना काही बाबींची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे जसे कि बॅटरी याच मशीन मध्ये देण्यात आलेली आहे, यास नेटवर्किंग मध्ये जोडता येत नाही आणि सर्वात महत्वाचे यास इंटरनेट जोडणी करता येत नाही. ई.व्ही.एम. उत्पादित करताना प्रोग्राम केल्या जातात ज्या पुन्हा रि-प्रोग्राम करता येत नाहीत. याच मशीन च्या एम-३ आवृत्ती मध्ये व्ही.व्ही.पॅट यंत्रणा देण्यात आलेली आहे ज्यामुळे मतदान कोणास केले या बद्दल ची माहिती मतदारास दिसते.
          २०१४ साली एक शोध निबंध प्रकाशित झाला होता, “भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि सामाजिक नवकल्पनांची मनोरथे” (मुक्त अर्थ)- India's Electronic Voting Machines (EVMs): Social construction of a "frugal" innovation, हा निबंध मॅक्सिमिलियन हेरस्टॅट आणि कॉर्नेलियस हेरस्टॅट यांनी सादर केला होता. या शोध निबंधात त्यांनी स्पष्ट नोंद केली आहे कि भारतातील मतदान यंत्र हि इतर देशांच्या (खास करून युनायटेड स्टेट्स) तुलनेत वेगळी आहेत आणि जास्त समृद्ध आहेत. हि यंत्र वापरायला सोपी ,कमी खर्चिक आणि अधिक कार्यक्षम आहेत.
          आज पर्यंत ३१ देशांनी ई.व्ही.एम. चा स्वीकार आणि अभ्यास केला आहे. या पैकी राष्ट्रीय स्तरावर फक्त ४ देश याचा वापर करतात. पण ज्या देशांनी याचा अस्वीकार केला त्याची कारणे हि अनेक आहेत जसे कि यात धोका आहे, असंविधानिक आहे. काही ठिकाणी दबावगट खूपच सक्रीय झाला आणि त्यांनी यावर बंदी आणली, काही ठिकाणी या यंत्राला वापरण्यास प्रोग्रामिंग ज्ञान असणे  आवश्यक आहे आणि ते सामान्य लोकांकडे असणार नाही म्हणून बंदी आहे.
काहीही असो भारतीय निवडणूक आयोगास या प्रणालीवर फार गर्व आहे आणि आयोगाचे म्हणणे आहे की या मशीन परिपूर्ण व मशीन सोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड (बदल) करता येणे शक्य नाहीत.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?