पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

ओ मेरे दिल के चैन : मजरूह सुल्तानपुरी

इमेज
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी गीतकार अस म्हणालो तर वावग होणार नाही, असे ‘असरार उल हसन खान’ म्हणजेच आपल्या सर्वांचे मजरूह ! एक गीतकार, उर्दू कवी म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. जवळपास सहा दशक हिंदी चित्रपट सृष्टीत योगदान देणारे मजरूह विरळच वाटतात मला, नौशाद साहेबांपासून ते पार अलिकडील अनु मलिक, जतीन-ललित, ए.आर.रेहमान या संगीतकारांसोबत देखील मजरूह यांनी गाणी दिली आहेत. १ ऑक्टोबर १९१९ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मजरूह यांचा जन्म झाला, म्हणूनच त्यांनी सुल्तानपुरी हे आडनाव लावलं. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. वडिलांची खूप इच्छा होती कि त्यांनी युनानी शिकावं आणि हकीम व्हावं तसा प्रयत्न देखील त्यांनी केला पण त्यांचा ओढा हा कविता लिहिण्याकडे होता आणि त्यांची हीच आवड त्यांना स्वप्न-नगरी मुंबई कडे घेवून आली. दरम्यानच्या काळात विविध संमेलनात सहभाग नोंदवीत घरखर्च पार पाडला जायचा. मजरूह साहेब जिगर मुरादाबादी यांना गुरु स्थानी मानत. त्यांच्याकडून शायरीचे धडे घेतले. १९४५ मध्ये एका कवी संमेलनामध्ये चित्रपट निर्माता ए.के.कारदार यांची नजर मजरूह यांच्यावर

ब्रेकिंग न्यूज

इमेज
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) या साठीच आपण टेलिव्हिजन समोर असतो असचं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीत याच टी.आर.पी. साठी सगळा खेळ सुरु असतो. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार ( त्यांच्या लेखी ) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. सगळ्यात जास्त जाहिराती कुणी दाखवीत असतील तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया अर्थात चॅनल्स, तुम्ही पहा एखादी ब्रेकिंग न्यूज आली रे आली (आजकाल अनेक ब्रेकिंग न्यूज येतात- अगदी एकामागोमाग एक) कि हा खेळ सुरु होतो. मग एक बातमी आणि लगेच ब्रेक अस काहीतरी समीकरण असतं या मंडळींचं ! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने कौल दिला त्याप्रमाणे सरकार स्थापन व्हायला हवं होतं आत्तापर्यंत पण नाही होवू शकलं, कारणं अनेक असतील पण या न्यूज चॅनल्स नी पार खेळ खंडोबा केला या बातमीचा , अस नाही का वाटतं तुम्हाला ?, पत्रकारिता हा लोकशाहीतील चौथा स्तंभ असे म्हणतात पण “सर्वप्रथम आम्हीच” या स्पर्धेत विश्वासार्हता हरवत चालली आहे, हे मात्र नक्की. या स्पर्धेत जर एखादी बातमी फ्लॅश झालीच आणि क