पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन

इमेज
“ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी ले लो”, या सुदर्शन फाकीर लिखित हे गीत आपण अनेक वेळा ऐकतो आणि आपल्याला वाटतं कि खरच असं घडावं, इच्छा तर खूप होते पण तस काही घडत नाही. बाल्यावस्था, किशोर, तारुण्य, जरावस्था या जीवनातील मनुष्याच्या अवस्था, या प्रत्येक अवस्थेतून मनुष्यास जावे लागते . विविध अवस्थांमध्ये विविध कामना मनुष्य बाळगून असतो, त्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी कार्यरत देखील असतो किंबहुना जीवाचं रान करत असतो. महाविद्यालयीन जीवन , टीन एज आयुष्यातील भन्नाट दिवस, जी काय मजा करायची ती याच दिवसात अस म्हणालो तरी अतिशयोक्ती होणार नाही, पॉकेट मनी हि महाविद्यालयीन जीवनात चालू व्हायची, साधारण ९० च्या दशकात तरी याच वेळी चालू व्हायची पण अलिकडे शाळेतच सुरु होते, असो, पण या पॉकेट मनी मध्ये जी काय धमाल असायची ती आज कमवत असलेल्या पैशात नाही. तसं पाहिलं तर लहानपणी खाऊ साठी पैसे मिळायचे, घरी आलेल्या नातेवाईकां कडून, मग ते पिगी बँकेत साठवायचे आणि खर्च करायचे असल्यास त्यातून खर्च करायचा असा रिवाज होता. या खाऊ साठी मिळणाऱ्या पैशास पॉकेटमनीच म्हणावी, नाही का? हि पॉकेट मनी त्या आयुष्यात मनमुराद आनंद द्यायची,

प्रवाशांच्या सेवेसाठी ?

इमेज
बदल हि काळाची गरज आहे, काळानुरूप स्थित्यंतर घडतं असतात असं म्हणतात, असं ऐकिवात आहे पण काही गोष्टी त्यास अपवाद आहेत असचं म्हणावं लागेल. मी आता अपवाद गोष्टींची यादी इथे देणार नाही पण एक अनुभव मात्र नक्की शेअर करणार आहे, ज्यात मला असं दिसून आलं कि काळानुरूप त्यामध्ये बदल घडलाच नाही, किंबहुना या मंडळीना बदल स्वीकारायचाच नाही ! स्वत:चे वाहन घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन ची सेवा फार कमी वेळा घ्यावी लागली पण तरी साधारण २०१० पर्यंत राज्य परिवहन ची सेवा सातत्याने घेत आलो आहे, म्हणजे साधारण १० वर्ष झाली या सेवेपासून दूर आहे, पण लक्ष आहे (हे महत्वाचे), नुकतचं नाशिक इथे एका कार्यक्रमा निमित्त जाणे झाले आणि यावेळी खास आवर्जून राज्य परिवहन ची सेवा घेण्याचे ठरविले आणि प्रवासाचा बेत आखला. रात्री प्रवास करायचा असल्यास त्या सेवेस “रातराणी” ने प्रवास असे संबोधण्याचा राज्य परिवहनचा प्रघात आहे ! त्यानुसार आरक्षित आसनावरून प्रवास नियोजित केला आणि प्रवासाचा क्षण आला, वेळे नुसार स्थानकावर पोहोचलो आणि बस मध्ये प्रवेश करणार इतक्यात लक्ष गेले (खर तर लक्ष जायला नको होते पण काय करणार स्वभाव ! आणि स्वभावास