इन्कलाब झिंदाबाद
“इन्कलाब झिंदाबाद” हा नारा शहीद भगतसिंग यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्ली विधानसभेत ब्रिटीशांचे लक्ष वेधण्यासाठी जेंव्हा बॉम्बस्फोट (रिकाम्या बाकावर) केला तेंव्हा दिला , हे आपण सगळेच जाणतो. स्वतंत्रता मिळविणे , नव चेतना जागविणे हेतूने, एक संघता राखण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हा नारा दिला. अनेकांनी प्राणाची आहुती दिली मग या देशास स्वातंत्र्य मिळाले. “इन्कलाब झिंदाबाद” याचा इंग्रजी मध्ये अर्थ होतो, “Long Live Revolution” ज्यास हिंदीत “क्रांती अमर रहे” असे म्हंटले जाते. प्रत्यक्षात “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा उर्दू कवी व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी १९२१ मध्ये सर्व प्रथम लिहिला. याचा वापर भगतसिंग यांनी १९२९ मध्ये केला. १९१७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात क्रांतीचे वारे वाहू लागले होते,आर्यलंडच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते, आता हाच धागा भारतातील तरुणांनी पकडला आणि बदलाचे वारे वाहू लागले. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्या समाप्ती नंतर भारतात असंतोष पसरू लागला होता, लोग रस्त्यावर उतरू लागले होते. या जागतिक युद्धात भारतीय