फॉलोअर

गीग इकॉनॉमी म्हणजे काय ?

भारतात हि एक नवी अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे. विविध सेवा मागणारा एक वर्ग आणि त्या सेवा पुरविणारा दुसरा वर्ग असे या गीग इकॉनॉमी मध्ये म्हंटले जाते. ज्यास आपण टास्क बेस्ड इकॉनॉमी अस संबोधू. पण गीग म्हणजे काय तर एखादी सेवा पूर्ण करणारा एक व्यक्ती अथवा त्याच्या सारखे अनेक व्यक्ती जे एखाद्या सेवेसाठी पुढाकार घेतात आणि ती सेवा पूर्ण करतात. एखादं उदाहरण घेऊया, सुरेशला त्याच्या कंपनीच्या प्रमोशन साठी मार्केटिंग करणे हेतू सेवा घ्यायच्या आहेत, तर त्यास यामध्ये मदत करणारा एक वर्ग जो त्याचा कर्मचारी नाही पण तो /ती सेवा देण्यास समर्थ आहे असे त्यास सेवा देतील (सेवेची किमत हि बोली लावून अथवा जाहीर करून करता येते.) आणि त्या सेवेच्या मोबदल्यात आर्थिक उलाढाल होईल. ज्यास फ्री लान्सिंग असं म्हणतात, म्हणजे सेवा पुरविणारा / देणारा  होण्याकडे भारतात कल वाढतो आहे, कारण हा नऊ ते पाच असा जॉब नाही ठरू शकतं, सेवा देणारा त्याच्या सोईने सेवा पूर्ण करू शकतो फक्त ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करणे यास महत्व देण्यात येते, आणि मला वाटतं ते आवश्यक आहे.
          संपूर्ण जगात देखील याचा ओघ वाढतो आहे जो साधारण दोन ते तीन अब्ज डॉलर जागतिक बाजारपेठ एवढा रेकॉर्ड झाला आहे ज्याची वार्षिक टक्केवारी हि १४% एवढी आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे मूल्य हे १ अब्ज डॉलर एवढे आहे, एका सर्वेक्षणा नुसार भारतात गीग इकॉनॉमी वर्करची संख्या हि १५ दशलक्ष आहे हि मंडळी आयटी, प्रोग्रामिंग, वित्त (फायनान्स), मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स), योजना व आराखडा (डिझाईन), आणि इतर क्षेत्रात सेवा देतात. डिजिटलायझेशन जसे वाढते आहे तसे रिमोट लोकेशन वरून एखाद काम करून घेण्याचा कल देखील वाढतो आहे, ऑनलाइन आणि ऑफलाईन अशी दोन क्षेत्र खुली आहेत जी पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्याना प्रोत्साहित करत आहेत त्यासोबतच सेवा पुरविणारे उत्तमच सेवा कशी देऊ करतील याकडे कंपन्याचे लक्ष आहे, आणि त्यानुसार घडतही आहे. एखादं काम मिळालं तर त्याची गुणवत्ता जपणं हे सेवा देणाऱ्याने पाहिलेच पाहिजे. भारत हा फ्लेक्सी स्टाफिंग या प्रकारात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे, यामध्ये यु.एस.,चायना, ब्राझील, जपान यांचा क्रम भारता अगोदर लागतो. भारतात हरियाणा, मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश, गुजरात आणि तेलंगाना या राज्यात फ्री लान्सिंग साठी सर्वात जास्त संधी नोंदविल्या गेल्या आहेत. काम करण्यात वेळेचे स्वातंत्र्य, तंत्रज्ञान श्रेणी सुधारणा, कौशल्य विकास, मानवी क्षमतांचा पुरेपूर वापर आणि महत्वाचं अतिरिक्त उत्पन्न या घटकांमुळे गीग इकॉनॉमी वाढण्यास चालना मिळत आहे.     

      अभ्यासातून असे दिसून आले आहे की औपचारिक नोकर्‍या नसल्यामुळे किंवा फक्त आर्थिक परिस्थिती विकसित करणे हेतू  केलेल्या विविध कामांद्वारे अधिकाधिक कंपन्यानी त्यांची प्रक्रिया अधिक तांत्रिकदृष्ट्या चालविण्यासाठी व्यवसायात बदल घडवून आणले जात आहेत, म्हणून फ्री लांसर्सची   संख्या वाढणे आवश्यक होत चालले आहे. एआय (आर्टिफीशियल इंटेलीजंस) आणि ऑटोमेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे नवीन जॉब प्रोफाइल तयार होऊ शकतात पण त्यास व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. येत्या काही वर्षांत अशा प्रकारच्या पदांसाठी पूर्णपणे नोकरी घेण्याऐवजी कंपन्यांकडून अधिकाधिक प्रोजेक्ट वर कौशल्याच्या आधारावर केवळ प्रतिभेपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
          भारतात गीग इकॉनॉमी आत्मसात करण्याची पूर्ण क्षमता आहे , आता हेच पहा ना एकूण लोकसंख्या १३३ करोड, यामध्ये वर्किंग एज (१५ ते ६५ वयोगट) लोकसंख्या साधारण ६६.८% म्हणजे ८९० दशलक्ष, हि सगळीच मंडळी काम करतील असे नाही यातील ५१.८% लोकसंख्या म्हणजे ४६१ दशलक्ष एवढी मंडळी कामगार शक्ती आपण म्हणूयात तरी पहा एवढ्या हाताना त्यांच्याकडील कौशल्या नुसार काम करण्याची संधी सहज प्राप्त होते आहे. या गणितामध्ये फक्त शहरी भागातील लोकसंख्या जरी आपण धरली तरी ती १३८ दशलक्ष एवढी होते, साधारण ३०%. गीग इकॉनॉमी मध्ये खालील क्षेत्र खुणावत आहेत, 1) डिजिटल मार्केट प्लेसेस: यात कौशल्यपूर्ण व्यक्ती ब्युटी, फिटनेस, प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल रिपेअर्स, ई विषयात सेवा पुरवू शकतो. उदा.Urbanclap, Care.com, HouseJoy, Helpr 2) सर्विस लिस्टिंग प्लॅटफॉर्म: या मध्ये प्रामुख्याने सेवा या प्रकारात मोडणाऱ्या गोष्टी येतात. सेवा देणारे आणि घेणारे. उदा. Guru, Truelancer.
         
तुम्हाला गीग इकॉनॉमी मध्ये योगदान द्यायचे आहे अथवा त्याचा भाग व्हायचे आहे तर विविध कौशल्य आत्मसात करावीत आणि एक फ्री लान्सर म्हणून करिअर घडवावे.
          
फ्री लान्सिंग साठी खूप खूप शुभेच्छा !!

माहिती स्त्रोत : इंटरनेटचे मायाजाल

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

YouTube: AMIT KAMATKAR

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?