मोह
शून्य अवस्था काय असते ? कधी अनुभवली आहे का? माणूस काहीच निर्णय घेऊ शकत नाही अथवा काहीच सुचत नाही (अंधकार पसरतो) अशा अवस्थेस मी शून्यावस्था म्हणतो. माणूस देवळात जातो आणि काही ना काही तरी त्या देवाकडे मागतो, प्रत्येकवेळी तो काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो कधीच देवाला भेटायला जात नाही, अर्थात ज्याच्याकडे श्रद्धा, भक्ति आहे तोच हा खटाटोप करतो- कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. भगवद् गीते मध्ये सांगितले आहे, आत्मिक संपत्ती हीच स्थिर, शाश्वत संपत्ती आहे, तिच्यात जो दोष निर्माण करतो तो “मोह”. “मोह” हा कुणाला चुकलाय ? सगळे ‘या’ मोह पाषात अडकून राहतातच, फक्त जेंव्हा आत्मा नश्वर शरीराचा त्याग करतो तेंव्हाच हा मोह सुटतो , मोह असतो तो पर्यन्त प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. अनंताच्या प्रवासाला जाणारी मंडळी देखील यापासून परावृत्त असतात म्हणूनच त्यांना मोहत्याग करता येतो अस काहीतरी असावं, मी काही यातील तज्ञ नाही त्यामुळे ठोस मत व्यक्त करू शकत नाही, पण अनुभवा आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे,एवढचं. गीते मध्ये व्याधींचे मूळ म्हणजे ‘मोह’ ,असे सांगितले आहे. मनुष्य प्र