फॉलोअर

मोह

 

शून्य अवस्था काय असते ? कधी अनुभवली आहे का? माणूस काहीच निर्णय घेऊ शकत नाही अथवा काहीच सुचत नाही (अंधकार पसरतो) अशा अवस्थेस मी शून्यावस्था म्हणतो. माणूस देवळात जातो आणि काही ना काही तरी त्या देवाकडे मागतो, प्रत्येकवेळी तो काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो कधीच देवाला भेटायला जात नाही, अर्थात ज्याच्याकडे श्रद्धा, भक्ति आहे तोच हा खटाटोप करतो- कारण देव हा श्रद्धेचा विषय आहे. भगवद् गीते मध्ये सांगितले आहे, आत्मिक संपत्ती हीच स्थिर, शाश्वत संपत्ती आहे, तिच्यात जो दोष निर्माण करतो तो “मोह”. “मोह” हा कुणाला चुकलाय ? सगळे ‘या’ मोह पाषात अडकून राहतातच, फक्त जेंव्हा आत्मा नश्वर शरीराचा त्याग करतो तेंव्हाच हा मोह सुटतो , मोह असतो तो पर्यन्त प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. अनंताच्या प्रवासाला जाणारी मंडळी देखील यापासून परावृत्त असतात म्हणूनच त्यांना मोहत्याग करता येतो अस काहीतरी असावं, मी काही यातील तज्ञ नाही त्यामुळे ठोस मत व्यक्त करू शकत नाही, पण अनुभवा आधारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे,एवढचं.

गीते मध्ये व्याधींचे मूळ म्हणजे ‘मोह’ ,असे सांगितले आहे. मनुष्य प्राण्याचा जन्म झाल्यापासून ते इहलोकाची यात्रा संपे पर्यन्त ‘मोह’ काही पिच्छा सोडत नाही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा मोह हा होतच राहतो. ‘मोह’ मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो तसेच तो वास्तव ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो. डोळे बंद करून फक्त मोहाच्या मागेच जात राहिलो तर फरफट नक्कीच !! पण ज्ञान प्राप्त करण्यास डोळे उघडे ठेवले तर.. काही रसाळ गोमटी फळे मिळतात का ? याचं उत्तर माझ्याकडे नाही पण एक अनुभव नक्की आहे,  शिशिरच्या वडीलांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील मोठ्या हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलं. डॉ. खांडेलवाल हे पुण्यातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन यांच्या देखरेखी खाली ट्रीटमेंट सुरू होती. ज्या दिवशी ब्रेन हॅमरेज झालं त्या दिवशी शिशिर सोसायटी मधील देवळात गेला आणि देवासमोर हात जोडून उभा राहिला पण त्याला देवाशी काय बोलावे? काय मागावे?  कळेना (ही शून्यवस्था असते याचं भान त्याला त्या दिवशी आलं), तो फक्त स्तब्ध उभा राहिला, त्याची आई मात्र देवाचा धावा करीत होती.  ब्रेन हॅमरेज झाल्यावर केले जाणारे उपचार हे मेडिकल एस्ओपी नुसार सुरूच होते, गरज होती ती आध्यात्मिक शक्तीची, जी चमत्कार घडवू शकेल आणि शिशिरच्या वडीलांना त्रासातून मुक्ती देऊ शकेल , बरं करू शकेल.


आपली व्यक्ती आपल्याला हवी असतेच, पण विधिलिखित कुणाला चुकलं आहे ? हॉस्पिटल मधील अनेक उदाहरणे देता येऊ शकतात पण इथे विषय आहे शिशिरच्या वडिलांचा !! शिशिरला वडील कोणत्याही परिस्थितीत बरे व्हावेत अशी इच्छा होती अर्थात आपल्या व्यक्ती विषयी असणारा प्रेम, आपुलकी भाव, ती व्यक्ती हवी वाटणे म्हणजे ‘मोहच’, या मोहाने शिशिरला वास्तवाचे ज्ञान देऊन देखील, तो वास्तवापासून कोसो दूर होता. त्यास वाटायचं की सगळं व्यवस्थित होईल, भाबडी आशा !! हॉस्पिटल मधील आठवड्याभराचा वेदनादायी प्रवास पूर्ण करून शिशिरच्या वडिलांनी इहलोकाची यात्रा संपवली, शिशिर चे वडील मात्र या मोहपाशात अडकले नाहीत, त्यांनी वास्तवाचा स्विकार केला आणि …………………

वास्तवाचे भान आल्यावर निर्णय घेता येणं हे एक कसब आहे, हे सगळ्यानाच जमतं असे नाही, पण आपण काय शिकावं तर ‘वास्तवाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर स्विकार करणं आणि निर्णय घेणं !!’ एकदा निर्णय घेतला की पुन्हा माघार नाही, निर्णयावर ठाम राहता येणं देखील आवश्यक असतं.

भगवद् गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात श्लोक ६६ मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥

अर्थात मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार?

म्हणूनच मन आणि इंद्रिय यांना काबूत ठेवले तर निश्चयात्मक बुद्धी ठोस निर्णय घेण्यास मदतगार ठरते आणि हेच शिशिरच्या वडिलांनी केलं.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं.

टिप्पण्या

  1. **अतिशय उत्कृष्ट**
    मनुष्याने जे जे कुठलेही कर्म चांगले अथवा वाईट परम अशा ईश्वरास समर्पित केले तर जिवंतपणीच या मोहमायेतून मुक्ती मिळण्यास शक्य होऊ शकेल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?