फॉलोअर

पल पल दिल के पास – एक मास्टरपीस

 

संगीतकार कल्याणजी-आनंदजी, गीतकार राजेंद्रकृष्ण आणि किशोरदांच ऑल टाईम हिट गाणं, सगळ्यांच फेव्हरीट गाणं अशी ज्या गाण्याची ओळख सांगता असं गाणं म्हणजे “पल पल दिल के पास”, प्रत्येकाच्या ओठावर असणारं गाणं आणि तितकच “दिल के पास” सुद्धा असणारं, गाण्याची सुरुवात ज्याप्रकारे चित्रित केली आहे, त्यास त्याकाळी (मला वाटत सध्या देखील) तोडच नाही, राखी जी पत्र हातात धरून वाचत आहेत आणि धरमपाजी पत्रातून गाणं (नायिकेची कल्पना) म्हणत आहेत. जणू काही पत्रात तोच मजकूर लिहिला आहे. या गाण्याची खासियत मला आणखी एक वाटते , गाण पाहताना दोन स्क्रीन दिसतात, एकावर राखी जी दिसतात तर दुसऱ्या स्क्रीन मध्ये पाठीमागे धरमपाजी दिसतात. हा कल्पनाविष्कार खूपच उत्तमरित्या चित्रित केला आहे.


१९७३ साली प्रदर्शित झालेला ब्लॅकमेल हा विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट. भलेही चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही पण संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचं एक मास्टरपीस म्हणून या चित्रपटाचं संगीत नक्कीच उजवं ठरतं. गाणं कसं चित्रित करावं यावर आनंदजी यांची चांगली पकड असायची त्यानुसार त्यांनी अनेक चित्रपटातून याची झलक दाखविली आहे पण या गाण्यात या संगीतकार जोडीने कमालचं केली आहे असं मी म्हणेन....

प्रत्यक्षात गाणं रेकॉर्ड करताना एक एक पल (क्षण) पुढे जातोय आणि दिवसा स्वप्न पाहणारा नायक कसा व्यक्त होतोय हे उत्कट चित्रण मनाला नक्कीच भावतं ! हे गाणं जेंव्हा किशोरदांनी गायलं तेंव्हा ते खूपच व्यस्त होते, एवढ्या व्यस्तते मध्ये देखील गाण्यातले उतरलेले भाव १०० टक्केच म्हणावे लागतील. संगीतकार कल्याणजी यांना देखील नायिकीचे काल्पनिक विश्व दाखविण्याचा मानस होता, ही कल्पना चित्रित करताना हातातील पत्रं वाऱ्याने उडतात आणि झाडात अडकतात, नंतर बिछान्यावर अंथरलेली दिसतात आणि एक एक क्षण तुझ्याशी कसा जोडला गेला आहे हे सांगणारा नायक ! सर्व अप्रतिम !! प्रेमवीराचे भावविश्व चितारणारं हे गीत अनेकांच्या खरचं “दिल के पास” असेल......

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


जाता जाता :-

तुम सोचोगी क्यूँ इतना, मैं तुमसे प्यार करूं

तुम समझोगी दीवाना, मैं भी इक़रार करूं

दीवानों की ये बातें, दीवाने जानते हैं

जलने में क्या मज़ा है, परवाने जानते हैं

तुम यूँ ही जलाते रहना, आ आ कर ख़्वाबों में

पल पल दिल के पास, तुम रहती हो ||


तुमचीही या गीता विषयी काही आठवण असल्यास कमेन्ट मध्ये जरूर शेअर करा.


इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करावं.

टिप्पण्या

  1. या गाण्याची लोकप्रियता खरेच अचंबित करणारी आहे.
    साधारणत: ग्रामीण एस टी स्टँडजवळच्या चहाच्या टपरीवर वाजणारी गीते उडत्या चालीची, तडतडणारी असतात. पण 'पल पल दिलके पास' हे त्याला अपवाद!
    असंच काहीसं 'प्रेमरोग'मधील गाण्यांच्या बाबतीतही आढळून येतं.
    किशोरदा गाण्याचा मूड,शब्द व भाव शब्दश: जगले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. या गाण्याची लोकप्रियता खरेच अचंबित करणारी आहे.
    साधारणत: ग्रामीण एस टी स्टँडजवळच्या चहाच्या टपरीवर वाजणारी गीते उडत्या चालीची, तडतडणारी असतात. पण 'पल पल दिलके पास' हे त्याला अपवाद!
    असंच काहीसं 'प्रेमरोग'मधील गाण्यांच्या बाबतीतही आढळून येतं.
    किशोरदा गाण्याचा मूड,शब्द व भाव शब्दश: जगले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  3. मुळातच मला किशोर दांची सर्वच गाणी खूपच आवडतात आणि त्यापैकी हे एक मास्टरपीस म्हटलं तरी हरकत नाही त्यांची गायकी त्याचा आवाज बोला मधले चढ-उतार अतिशय सुंदर कित्येक शतकामध्ये असा एखादा कलाकार निर्माण होतो पण यापुढे किशोरदा सारखा कोणी निर्माण होईल असे मला नाही वाटत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?